Koregaon : NCP सभापती जगदाळेंचा राजीनामा

NCP
NCPesakal
Updated on
Summary

आमदार शशिकांत शिंदेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जगदाळे यांनाच पुन्हा सभापतिपदी काम करण्याची संधी दिली होती.

कोरेगाव (सातारा) : पंचायत समितीचे (Koregaon Panchayat Committee) सभापती राजाभाऊ जगदाळे (Speaker Rajabhau Jagdale) यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Nationalist Congress Party) अन्य सदस्यास संधी मिळावी, या हेतूने श्री. जगदाळे यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या पंचवार्षिकमधील पहिल्या अडीच वर्षांच्या टर्ममध्ये सभापतिपदी राजाभाऊ जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये सभापतिपदाचे आरक्षण कायम राहिल्याने आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्री. जगदाळे यांनाच पुन्हा सभापतिपदी काम करण्याची संधी दिली.

NCP
रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत पंतप्रधानांच्या भेटीला

या कालावधीत श्री. जगदाळे यांनी सर्व सदस्यांना बरोबर घेऊन प्रशासनाशी समन्वय साधत पंचायत समितीचे कामकाज चांगल्या प्रकारे चालवले. सत्ताधारी व विरोधक, असा भेद न ठेवता सर्वच सदस्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन कामकाज चालवले. दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादीमधील अन्य सदस्यास संधी मिळावी, या हेतूने त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून, सभापतिपदी नवीन निवड होईपर्यंत प्रभारी सभापती म्हणून उपसभापती संजय साळुंखे यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.