लाल मातीत पिकणारी 'स्ट्रॉबेरी' खरी! 'भारतीय पोस्ट'कडून शिक्कामोर्तब

स्ट्रॉबेरीचा नावलौकिक आणखी वाढणार : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Strawberries
Strawberriesesakal
Updated on

भिलार (सातारा) : महाबळेश्वर तालुक्यातील (Mahabaleshwar Taluka) स्ट्रॉबेरीवर (Strawberries) जिओग्राफिकल इंडिकेशन टॅगची मोहर यापूर्वीच उमठली आहे. यामुळे या लाल मातीत पिकणारी स्ट्रॉबेरी खरी असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय पोस्टाने (Indian Post) स्ट्रॉबेरीचे विशेष स्पेशल कव्हर प्रकाशित केल्याने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा नावलौकिक आणखी वाढणार आहे, असे मत जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी केले.

Summary

महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीवर जिओग्राफिकल इंडिकेशन टॅगची मोहर यापूर्वीच उमठली आहे.

पाचगणी येथील बहाई भवन येथे विशेष समारंभात महाबळेश्वर स्ट्रॉबेरी विशेष स्पेशल कव्हरच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. या वेळी पुणे विभागाच्या जनरल पोस्टमास्तर मधुमिता दास, पोस्टाच्या वरिष्ठ अधीक्षक अपराजिता मिध्रा, महाबळेश्वर फळे, फुले सहकारी संस्थेचे अध्यक्ष किसनशेठ भिलारे, बहाई ॲकॅडमीचे अध्यक्ष लेसन आजादी, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, उद्योजक मयूर व्होरा, हुसेन माला, हिलरेंज हायस्कूलचे संचालक जतिन भिलारे व तेजस्विनी भिलारे, पाचगणीचे पोस्टमास्तर सचिन सांवत उपस्थित होते.

Strawberries
अभिमानास्पद! टोकियोत पदक हुकलेल्या खेळाडूंसाठी 'Tata'चे खास 'गिफ्ट'
Strawberries
Strawberries

मधुमिता दास म्हणाल्या, ‘‘पोस्टाच्या मेल व्हॅनमधून शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी ट्रान्स्पोर्ट करता येईल.’’ अरजिता मिश्रा म्हणाल्या, ‘‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला जीआय टॅग मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना कसा फायदा झाला हे जाणून घेतले. त्यातून स्ट्रॉबेरी उत्पादकांचा आणखी फायदा व्हावा, यासाठी पोस्टाच्या माध्यमातून स्पेशल कव्हर करून स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे.’’ किसनशेठ भिलारे यांनी स्ट्रॉबेरीचा इतिहास व महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचे वैशिष्ट्य सांगितले. राजन सांवत, नीलकमल भारतद्वाज यांनी सूत्रसंचालन केले. वाई सब डिव्हिजन इन्स्पेक्टर शरद वांगकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()