Pusesawali Riots : पुसेसावळी दंगलीत एकाचा मृत्यू, 10 जण जखमी; पोलिस महानिरीक्षकांनी केलं 'हे' आवाहन

गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे २३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
Pusesawali Riots Sunil Phulari
Pusesawali Riots Sunil Phulariesakal
Updated on
Summary

पुसेसावळी (ता. खटाव) येथील घटनेच्या अनुषंगाने औंध पोलिस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथील कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर (Pusesawali Riots) नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी (Sunil Phulari) यांनी केले.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे २३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल (ता. १०) इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.

Pusesawali Riots Sunil Phulari
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल उसळताच उदयनराजेंनी मध्यरात्री दिली घटनास्थळी भेटी; केलं महत्त्वपूर्ण आवाहन

त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांना चौकशीकामी बोलवून विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या समूहाच्या युवकांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. काल रात्री साडेनऊच्या सुमारास दुसऱ्या समूहाच्या विचारसरणीच्या सुमारे शंभर ते दीडशे युवकांनी एकत्र जमून अचानकपणे दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून दिली.

Pusesawali Riots Sunil Phulari
Pusesawali Violence : पुसेसावळीत दंगलीचा भडका उडताच इंटरनेट सेवा बंद; जाळपोळीनंतर गावात कर्फ्यू, कधी सुरु होणार Internet?

पहिल्या समूहातील युवकांना मारहाण करून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करत असताना पोलिसांनी योग्य त्या बाळाचा वापर करून सदर जमावास पांगवण्यात यश मिळवले. या मारहाणीमध्ये एकूण दहा व्यक्ती जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे, तसेच सदर घटनेमध्ये एक व्यक्ती (Noorhasan Shikalgar) उपचारादरम्यान मृत झाली आहे.

Pusesawali Riots Sunil Phulari
Pusesawali Riots : पुसेसावळीत मोठी दंगल; विक्रम पावसकरांच्या अटकेसाठी अल्पसंख्याक बांधव रस्त्यावर, भाजप नेत्यावर काय आहे आरोप?

पुसेसावळी (ता. खटाव) येथील घटनेच्या अनुषंगाने औंध पोलिस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. वाळवेकर, औंध पोलिस ठाणे हे करीत आहेत. या घटनेतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करीत आहेत. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे २३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे श्री. फुलारी यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.