कराड : एसटी कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीसह अन्य मागण्यांसाठी आज मंगळवारी सकाळपासून अचानकपणे काम बंद आंदोलन (ST Bus Strike) सुरू केले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर व अन्य आगारातून एकही एसटी बस आज सकाळच्या टप्प्यात बाहेर पडलेली नाही. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.