प्रवास होणार सुखकर! कऱ्हाड आगारातून 13 मार्गावर धावणार 'लालपरी'

Karad ST
Karad STesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड येथील एसटी आगारातून (Karad ST Depot) दोन महिन्यापासून बंद असलेल्या १३ मार्गावरील एसटीसेवा आजपासून (सोमवार) सुरु करण्यात आली. सध्या हळूहळू अनलॉक होवू लागल्याने ही सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय मोरे (Depot Manager Vijay More) यांनी आज दिली. (ST Service Started On 13 Route From Karad ST Depot Satara Marathi News)

Summary

कऱ्हाड एसटी आगारातून दररोज दोन हजारांवर एसटी फेऱ्यांची ये-जा सुरु होती.

येथील एसटी आगारातून (Maharashtra State Road Transport Corporation) दररोज दोन हजारांवर एसटी फेऱ्यांची ये-जा सुरु होती. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन (Coronavirus Lockdown) सुरु असल्याने एसटी सेवेवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे एसटीची चाके जागेवरच थांबली होती. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी आगाराला बसला आहे. एसटीतून रोजच्या फेऱ्या बंद असल्याने आर्थिक उत्पन्नही बंद झाले होते. त्यानंतर हळूहळू सेवा सुरु करण्यात आली. मात्र, त्यानंतर कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढल्याने पुन्हा जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी कडक लॉकडाउन सुरु केला.

Karad ST
कऱ्हाड पालिकेची स्वच्छ सर्वेक्षणात आघाडी, तर नदी स्वच्छतेत पिछाडी!

जिल्हा बंदीही केली होती. त्यामुळे एसटीचे प्रवाशी सेवाही बंद राहिली. सध्या मात्र हळूहळू अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एसटीच्या येथील आगारातून सध्या १३ मार्गावर प्रवासी सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, लातुर, उस्मानाबाद, चिपळूण, तासगाव, मिरज, पाटण, शेडगेवाडी, ढेबेवाडी या फेऱ्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणावरुन पुन्हा रिटर्न कऱ्हाडलाही बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी एसटीच्या प्रवासी सेवेस सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक श्री. मोरे यांनी केले आहे.

ST Service Started On 13 Route From Karad ST Depot Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()