Satara
SataraSakal

पुरेशा ओलीअभावी पेरणी सुरू

खटावमधील शेतकरी करताहेत धाडस; चार ते दोन दिवसांत पाऊस पडण्‍याची आशा
Published on

खटाव : अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी दुधाची तहान कशीतरी ताकावर भागवत खरिपाचा हंगाम उरकून घेतला. संपूर्ण मॉन्सूनच्या काळामध्ये पावसाची चातकासारखी वाट पाहून थकलेला बळिराजा आता धोका पत्करून जमिनीत पुरेशी ओल नसतानाही रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी करण्यास सरसावला आहे. आभाळात अचानक जमा होणाऱ्या ढगांकडे बघत येत्या चार ते दोन दिवसांत पाऊस पडेल, या केवळ आशेवर खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असतानादेखील पेरणी करत बाकीचे सारे रामभरोसे सोडल्याचे दिसत आहे.

तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणीची कामे सुरू आहेत. यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जात आहे. यंदा पावसाने व हवामान खात्याने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी घेवडा, सोयाबीन पावसाअभावी जाग्यावरच करपून गेली. जून, जुलैमध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, मुसळधार पावसाची सर्वच नक्षत्रे खाते न उघडता कोरडीच गेली. हातातोंडाला आलेली पिके वाया गेली.

Satara
सुधागड तालुक्यात देवीचे विसर्जनावेळी 2 तरुणांचा बुडून मृत्यू

यावर्षी गावागावांतील तलाव, बंधारे, विहिरींमध्ये जलसाठा अत्यल्प असून, मोठा पाऊस पडला नाही तर चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. जनावरांचा चारा प्रश्न मिटवण्यासाठी बहुतांश शेतकरी ज्वारीची पेरणी करतात. त्यामुळे येत्या आठवड्याभरात पाऊस पडला नाही तर पेरलेल्या रानात पाणी सोडून शेत भिजवले जाणार असल्याची माहिती शेतकरी सुरेश शिंदे यांनी दिली. खरीप गेला पण निदान जनावरे जगवण्यासाठी रब्बी हंगामात चारा तरी हाती लागावा, याच उद्देशाने हा निर्णय शेतकरी घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()