शिक्षण विस्ताराधिकारी पदोन्नतीसाठी राज्य संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

Education Minister Varsha Gaikwad
Education Minister Varsha Gaikwadesakal
Updated on

खंडाळा (सातारा) : राज्यातील पंचायत समिती शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गटशिक्षणाधिकारी (Group Education Officer) पदे रिक्त आहेत. या पदावर शिक्षण विस्तार अधिकारी (Education Extension Officer) कामकाज पाहत असून शासनाने एमडीएस व एमईएस असा भेदभाव न करता दिर्घकालीन काम करणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी. यासंबंधी विकल्प बदलून द्यायची संधी देऊन पदोन्नतीस पात्र ठरलेल्या दिनांकापासून ते ग्राह्य धरावे व श्रेणी-2 मध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारींना सहाय्यक शिक्षणाधिकारी असा संर्वग निर्माण करुन वर्ग-2 (दोन) चा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांना राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेकडून (State Education Extension Officers Association) करण्यात आली आहे. (State Education Extension Officer Association Demand To Education Minister Varsha Gaikwad Regarding Promotion Of Education Extension Officer Satara Education News)

Summary

राज्यातील पंचायत समिती शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत.

यावेळी या संघटनेच्या राज्य अध्यक्षा प्रतिभा भराडे, सचिव राजेंद्र आंधळे, व्यंकट कोमटवार, रमजान पठाण, नारायण कुमावत, गजानन आडे व सदस्य उपस्थित होते. या संघटनेच्या 2016 पासून या मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन देऊन चर्चा घडविण्यात आली. या मागण्यांचा विचार करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या निवेदनात म्हटले आहे, की, शिक्षण विस्ताराधिकारी अंतर्गत श्रेणी -2 मधील एमडीएसतील विस्ताराधिकारी यांना पदोन्नतीच्या संधी जवळपास नष्ट झाली असल्याने, तसेच परीक्षेद्वारे ही संधी उपलब्ध होत असल्याने 20 ते 25 वर्ष सेवा करणाऱ्या शिक्षण विस्ताराधिकारी यात संधी उपलब्ध होतच नाही. म्हणून श्रेणी-2 विस्ताराधिकारीस पदोन्नती देण्यात यावी.

Education Minister Varsha Gaikwad
'खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक; कऱ्हाडच्या नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा'

तसेच एमडीएस विकल्प भरुन देणाऱ्याच गटविकास व बालविकास अधिकारी होता येते. मात्र, येथे सहायक बीडीओ पद उत्पन्न झाल्याने येथे पदोन्नती मिळतच नसल्याने एमडीएस विकल्प भरलेल्यांना एमईएस विकल्प भरण्याची संधी देऊन, पदोन्नती पात्र ठरलेल्या दिनांकापासून पात्र ठरवावे. त्याचबरोबर शालेय गुणवत्ता टिकवणे, कोरोना काळात ऑनलाइन उपक्रमाची प्रभावी राबवणूक करणे व गटशिक्षणाधिकारी रिक्त पदभार कार्यक्षमतेने सांभाळण्याचे काम शिक्षण विस्ताराधिकारी करत असतानाही अद्यापही वर्ग-2 चा दर्जा शिक्षण विस्ताराधिकारी यास मिळाला नाही.

Education Minister Varsha Gaikwad
कृष्णा कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल पाहा एका क्लिकवर..

मात्र, समकक्ष इतर विभागात वर्ग 2 चा दर्जा दिला जातो. याप्रमाणेच शिक्षण विभागातील विस्ताराधिकारीस वर्ग-2 चा दर्जा द्यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात 3 ऑक्टोबर 2016 ला तत्कालीन शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय होऊन पाठपुरावा केला गेला. मात्र, अद्यापही न्याय न मिळाल्याने नुकतेच मुंबई येथे शिक्षणमंत्र्यांशी विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. यामुळे राज्यातील शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांचे शासनाच्या अध्यादेशाकडे लक्ष लागले असल्याचे राज्य अध्यक्ष प्रतिभा भराडे यांनी सांगितले.

State Education Extension Officer Association Demand To Education Minister Varsha Gaikwad Regarding Promotion Of Education Extension Officer Satara Education News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.