Satara : मुस्‍लीम-दलितांवरील हल्‍ले त्वरित थांबवा; रामदास आठवलेंच्या 'रिपाइं'चा जनआक्रोश

राज्‍यात मुस्‍लीम (Muslim) आणि दलित समाजावर (Dalit Community) हल्‍ले वाढले आहेत.
Muslim Dalit Community Satara
Muslim Dalit Community Sataraesakal
Updated on
Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीच्‍या कारणावरून नांदेड जिल्‍ह्यातील भोंडार येथील अक्षय भालेराव यांचा खून करण्‍यात आला होता.

सातारा : राज्‍यात मुस्‍लीम (Muslim) आणि दलित समाजावर (Dalit Community) हल्‍ले वाढले असून, ते रोखण्‍यात शासनाला अपयश आल्‍याचा आरोप करत रिपाइंच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला.

यावेळी जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट होऊ न शकल्‍याने निवेदन देण्‍यासाठी गेलेल्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या इमारतीतील पायऱ्यांवर ठिय्‍या आंदोलन केले. आंदोलन करूनही वरिष्‍ठ अधिकारी निवेदन स्‍वीकारण्‍यास न आल्‍याने आंदोलकांनी सरतेशेवटी निवेदन त्‍याठिकाणी असणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडे सोपवले.

Muslim Dalit Community Satara
Loksabha Election : जागावाटपावरुन युतीत जुंपणार? शिंदे गटात अस्वस्थता, भाजपकडून कमळाचा प्रचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीच्‍या कारणावरून नांदेड जिल्‍ह्यातील भोंडार येथील अक्षय भालेराव यांचा खून करण्‍यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना अटकदेखील केली आहे. यानंतर इतर ठिकाणीही दलितांवर हल्‍ले होण्‍याच्‍या घटना घडत होत्‍या. जातीय तणावातून नुकतेच कोल्हापूरसह इतर भागात मुस्‍लीम समाजावरदेखील हल्‍ले झाले. दोन्‍ही समाजांवर होणाऱ्या या हल्‍ल्‍यांमुळे समाजात अशांतता आहे.

Muslim Dalit Community Satara
Satara : राड्यानंतर शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसमोरच फोडला नारळ; म्हणाले, कायदेशीर असेल ते..

हे हल्‍ले रोखत त्‍यातील दोषींवर कठोर कारवाई करण्‍यात सरकार अपयशी ठरल्‍याचा आरोप करत या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यास अभिवादन केल्‍यानंतर हा मोर्चा राजवाडा येथे गेला. येथून पोलिस मुख्‍यालय मार्गे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर आला.

Muslim Dalit Community Satara
Siddheshwar Factory : 'कारखान्याची चिमणी जमीनदोस्त; सोलापूरची विमानसेवा महिन्यात सुरू होणार'

येथे आलेल्‍या आंदोलकांना जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या प्रवेशद्वारावर अडवत रिपाइंचे जिल्‍हाध्‍यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे, सादिक शेख व इतरांच्‍या शिष्‍टमंडळास निवेदन देण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात नेण्‍यात आले. जिल्‍हाधिकारी उपस्‍थित नसल्‍याने शिष्‍टमंडळ संतापले आणि त्‍यांनी आतील पायऱ्यांवर ठिय्‍या मारला. बराचवेळ बसूनही निवेदन स्‍वीकारण्‍यासाठी वरिष्‍ठ अधिकारी त्‍याठिकाणी न आल्‍याने जिल्‍हा प्रशासनाचा निषेध यावेळी उपस्‍थितांनी करत मागण्‍यांचे निवदेन एका कर्मचाऱ्याकडे सोपवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.