औंध सोसायटीत 13 जागांसाठी 26 उमेदवार आमनेसामने

Gayatridevi
Gayatrideviesakal
Updated on
Summary

बँकेच्या निवडणुकीनंतर औंध सोसायटी निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

औंध (सातारा) : येथील विकास सेवा सोसायटी (Aundh Development Services Society) नंबर एकमध्ये १३ जागेसाठी २६ उमेदवार नशीब अजमावत आहेत. परस्परविरोधी दोन गटांमध्ये अटीतटीची सरळ लढत होत असून, सत्तेसाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे, तर विकास सेवा सोसायटी नंबर दोनमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी (Gayatridevi) यांच्या गटाच्या १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, अनुसूचित जाती गटातील एका जागेसाठी निवडणूक होत आहे.

सोसायटी नंबर एकच्या निवडणुकीत (Aundh Society Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखालील श्री यमाई विकास पॅनेल आणि औंध संघर्ष समितीचे श्री जगदंबा परिवर्तन पॅनेल अशा दोन गटांत निवडणूक होत आहे. १३ जागांसाठी २६ उमेदवार नशीब अजमावत आहेत. दोन्ही गटांनी विजयासाठी कंबर कसली असून, निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. उमेदवारांनी सध्या सभासद मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. वातावरणात गारठा असला, तरी निवडणुकीमुळे औंधचे राजकीय वातावरण तापले आहे.

Gayatridevi
मला अध्यक्षपदावर पुन्हा संधी द्या; भाजप आमदाराची अजित पवारांकडे मागणी

१५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी दुपारी मतमोजणी होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर लगेचच होणाऱ्या औंध विकास सोसायटी निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील लोकांच्या नजरा निवडणुकीकडे लागल्या आहेत. औंध विकास सेवा सोसायटी नंबर एक व दोन या दोन्ही ठिकाणी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, जिल्हा बँकेत अनपेक्षित निकाल लागल्याने विरोधी गटाने आत्मविश्वासाने विजयाच्या ‘डबल आपटी बॉम्ब’साठी चांगलीच कंबर कसली आहे.

Gayatridevi
'सिल्व्हर ओक'वर ठरणार अध्यक्षपदाचा दावेदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.