Strawberry Crop : महाबळेश्वरात तब्बल 50 लाख स्ट्रॉबेरीचे मदरप्लांट परदेशातून आयात; उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला

महाबळेश्‍वर तालुक्यातील (Mahabaleshwar) स्ट्रॉबेरी पिकाला (Strawberry Crop) लहरी वातावरणाचा फटका बसू लागला आहे.
Strawberry Crop in Mahabaleshwar
Strawberry Crop in Mahabaleshwar esakal
Updated on
Summary

दरवर्षी परदेशातून ४० ते ५० लाख स्ट्रॉबेरीचे मदरप्लांट महाबळेश्वर तालुक्यात आयात होतात.

भिलार : महाबळेश्‍वर तालुक्यातील (Mahabaleshwar) स्ट्रॉबेरी पिकाला (Strawberry Crop) लहरी वातावरणाचा फटका बसू लागला आहे. शिवाय उत्पादन खर्चात तब्बल सातपट वाढ झाली आहे. एका रोपाची किंमत व त्याचा जतन खर्च हा २० ते २५ रुपये होता, तो आता १२० ते १८० रुपयांच्या घरात गेला आहे.

Strawberry Crop in Mahabaleshwar
मोठी बातमी! महाराष्ट्राचा विरोध झुगारून आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न; ड्रोनद्वारे होणार सर्व्हे

त्यामुळे वाढता उत्पादन खर्च, मिळणारे उत्पादन आणि बाजारात स्ट्रॉबेरीला मिळणारा भाव याची गोळाबेरीज तरी कशी करायची, असा प्रश्‍न उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यात १५०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होत असून, यापैकी एकट्या महाबळेश्वर तालुक्यात १३०० हेक्टरवर लागवड होते.

महाबळेश्वर तालुक्यात या वर्षासाठीच्या हंगामासाठी स्ट्रॉबेरी लागवड सुरू आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच लागवड केली आहे. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी दर वर्षीप्रमाणे अमेरिका, स्पेन, इटली या देशांमधून स्थानिक विकास सोसायट्यांच्या माध्यमातून रोपांची आयात करण्यात आली आहे.

Strawberry Crop in Mahabaleshwar
Biodiversity Crisis : पश्‍चिम घाटातली जैवविविधता संकटात! डोंगरावर वणवे लावून ऊस शेतीचा फंडा; कीटक, पक्ष्यांच्या अधिवासावर घाला

दरवर्षी परदेशातून ४० ते ५० लाख स्ट्रॉबेरीचे मदरप्लांट महाबळेश्वर तालुक्यात आयात होतात. महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे रोपनिर्मिती करता येत नसल्याने परदेशातून आयात करण्याबरोबर शेतकरी जावळी, वाई, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांमध्ये स्ट्रॉबेरीची रोपवाटिका केली जाते. त्यासाठी मोठा खर्च होतो. काही शेतकऱ्यांनी महाबळेश्वर तालुक्यातच आपल्याच शेतीत पॉली हाऊसमध्ये रोपांची निर्मिती करतात.

यावर्षीही याच पद्धतीने रोपनिर्मिती केली आहे. सध्या तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवडीची मोठ्या प्रमाणात लगबग चालू झाली. रोपवाटिकेतून तयार झालेल्या रोपांची लागवड सुरू आहे. शेतकरी आपल्या क्षेत्राला लागतील तेवढ्या रोपांची लागवड करून उरलेली रोपे अन्य शेतकऱ्यांना विकतात. १ हेक्टरवर सरासरी ५५ हजार रोपांची लागवड होते.

Strawberry Crop in Mahabaleshwar
Sulkud Water Scheme : आधी वादग्रस्त विधान, पण आता मुश्रीफांना इचलकरंजीबाबत घ्यावं लागणार नमतं; काय आहे कारण?

यावर्षी अवेळी हवामान आणि महागाई यामुळे रोपांचे दर कडाडले आहेत. गेल्या वर्षी स्ट्रॉबेरीच्या नाभिला जातीच्या एका रोपाची किंमत सात ते आठ रुपये होती. यावर्षी ती बारा ते १५ रुपयांवर पोचली आहे, तर विंटर जातीच्या रोपाची किंमत गेल्या वर्षी पाच रुपये होती यावर्षी ती सात ते आठ रुपये झाली आहे. रोपांची वाढलेली किंमत, औषधे, खते व मजुरांचे वाढलेले दर यामुळे स्ट्रॉबेरीची शेती करणे हे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे बनत चालले आहे.

Strawberry Crop in Mahabaleshwar
Asian Games : कष्टाचं झालं चीज! आशियाई क्रीडा स्पर्धेत आदितीचा 'सुवर्णवेध'; देदीप्यमान यशाने आई-वडील भारावले

स्ट्रॉबेरीला लागणारी खते, औषधे तर द्यावीच लागणार, त्यामुळे उत्पादन खर्च कोठे कमी करायचा, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शिवाय बदलत्या लहरी वातावरणाचा बसणारा फटका, मिळणारे उत्पादन आणि बाजारपेठेतील दर पाहता या सर्वांची गोळाबेरीज तरी करायची कशी, याची चिंताही या शेतकऱ्यांना लागली आहे.

Strawberry Crop in Mahabaleshwar
MPSC Exam : जिद्द असावी तर अशी! अधिकारी होऊनच सुषमानं ठेवलं गावात पाऊल; एकाचवेळी चार पदांवर मारली बाजी

स्ट्रॉबेरी लागवड

  • जिल्ह्यात १५०० हेक्टर लागवड

  • महाबळेश्‍वर तालुक्यात १३०० हेक्टर

  • अमेरिका, स्पेन, इटलीतून राेपांची आयात

स्ट्रॉबेरी शेती करणे शेतकऱ्यांना जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विचारपूर्वक, अनाठायी खर्च टाळून, शास्त्रोक्त पद्धतीने कमीतकमी खर्चात शेती करावी.

- श्रीकांत पवार (कासवंड), स्ट्रॉबेरी तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.