बाबू गणपत धनावडे यांचे अंदाजे दहा लाख रुपये, श्रीरंग कोंडिबा धनावडे यांचे आठ लाखांचे आणि अंकुश धनावडे यांचे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
भिलार/भोसे : सायघर (ता. जावळी) येथे स्ट्रॉबेरी (Strawberry) शेताच्या मळ्यात अनोळखीने रात्रीच्या वेळी तणनाशकाची फवारणी केल्याने पूर्ण शेतातील स्ट्रॉबेरी रोपे (Plant Strawberries) जळून खाक झाली आहेत. यामध्ये तीन शेतकऱ्यांचे (Farmers) सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.