महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात (Mahabaleshwar Taluka) स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते.
भोसे : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणी साचले असून, काही ठिकाणी स्ट्रॉबेरीची (Strawberry) लागवड करण्यात आलेली आहे. तर बहुसंख्य ठिकाणी पावसामुळे लागवड झाली नाही. लागवड केलेल्या रोपट्यांना पावसाचा फटका बसला आहे तर लागवड केली नसल्याने यंदा हंगाम महिनाभर उशिराने सुरू होणार असल्याचे मत स्ट्रॉबेरी शेतकरी (Farmer) बागायतदार यांच्याकडून होत आहे.