कऱ्हाडातील पन्नास गावं अंधारात; 'महावितरण'कडून वीजपुरवठा खंडित!

Street light
Street lightesakal
Updated on

काले (सातारा) : स्ट्रीट लाइटचे (Street light) वीजबिल न भरल्याने महावितरणने (MSEDCL) कऱ्हाड तालुक्यातील ५० गावांतील कनेक्शन बंद केली आहेत. स्ट्रीट लाइटचे वीजबिल (Electricity bill) भरण्यास शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने (Power Distribution Company) सर्व ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) थकीत वीजबिल भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. कऱ्हाड तालुक्यात तब्बल सहा कोटींच्या घरात थकबाकी आहे. (Street Lights Closed In 50 Villages Of Karad Taluka Satara Marathi News)

Summary

गावागावांतील स्ट्रीट लाइटचे बिल शासनामार्फत भरले जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून त्यासाठी नागरिकांना दिवाबत्ती कर भरावा लागतो.

गावागावांतील स्ट्रीट लाइटचे बिल शासनामार्फत भरले जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून त्यासाठी नागरिकांना दिवाबत्ती कर भरावा लागतो. त्यातून मिळणाऱ्या रकमेत शासनपातळीवर भर घालून वीज वितरण कंपनीला भरणा केला जातो. मागील काही वर्षांपासून शासनाने स्ट्रीट लाइट बिल महावितरणाला दिले नाही. तालुक्यात स्ट्रीट लाइटचे थकीत वीजबिल सहा कोटींच्या घरात आहे.

Street light
ऑनलाइन ग्रामसभा न घेणाऱ्या ग्रामपंचायतींवर होणार कारवाई?

वसुलीसाठी महावितरणने ग्रामपंचायतींना थकीत वीजबिल भरण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. १५ दिवसांत थकीत वीजबिल न भरल्यास प्रत्येक गावातील स्ट्रीट लाइट कनेक्शन बंद केले जाणार आहे. तालुक्यातील तब्बल ५० गावांतील स्ट्रीट लाइट बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. शासनाने तातडीने उपाययोजना करून वीजबिलाचा प्रश्‍‍न सोडवावा, अशी मागणी गावांतून होत आहे.

Street light
1880 काळातील वटवृक्षाची आजही केली जाते पूजा

कोरोनामुळे (Coronavirus) ग्रामपंचायतीचा कर वसूल थांबला आहे. स्ट्रीट लाइट वीजबिल भरणे न परवडणारे आहे. पूर्वीप्रमाणेच शासनाने वीजबिल भरणा करून प्रत्येक ग्रामपंचायतीला मदत करावी.

-अलताब मुल्ला, सरपंच, काले

Street Lights Closed In 50 Villages Of Karad Taluka Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.