सातारा : ओमिक्रॉनचा(omicron) प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने(state government) लागू केलेल्या नियमावलीची जिल्ह्यात(stara district) काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठीची नियमावली जिल्हाधिकारी शेखर सिंह (collector shekhar sinh)यांनी प्रसारित केली आहे. यात कोरोना प्रतिबंधक नियम आणि आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. राज्य शासनाने ता. २५ पासून रात्री नऊ ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी (curfew)जाहीर केली आहे. पुढील आदेश होईपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार असून, त्यासाठीची नियमावली स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रसिद्ध केली आहे. यानुसार खुल्या, तसेच बंदिस्त जागी होणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्यांचे दोन्ही वेळचे लसीकरण(vaccination) झाले असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवासासाठीही दोन्ही लशींचे बंधन असून, या वेळी नागरिकांनी केंद्र शासनाने लसीकरणानंतर दिलेला युनिव्हर्सल पास सोबत बाळगणे आवश्यक आहे. याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षितेला संबंधितांनी प्राधान्य देणे आवश्यक असून, वारंवार सूचना देऊनही जर नागरिक, व्यावसायिक व इतर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यांच्यावर पाचशे ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही श्री. सिंह यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.]
अशी आहे नियमावली
विवाह सोहळ्यात शंभरची उपस्थिती
सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर मर्यादा
हॉटेल, जीम,स्पामधील उपस्थिती ५० टक्के
पन्नास टक्के आसन क्षमतेवर कार्यक्रमांना परवानगी
संचारबंदीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
मास्कसह इतर गोष्टींचा वापर सर्वच ठिकाणी करणे बंधनकारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.