सातारा : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) पुन्हा वाढू लागल्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (शनिवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत पुन्हा कडक लॉकडाउन (Strict lockdown) लागू केले आहे. यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद (Shops closed) राहणार आहोत. अत्यावश्यक दुकानांसह सेतू, आधार केंद्रे व सीएंची कार्यालये, शैक्षणिक साहित्याची दुकाने (केवळ घरपोच सुविधेसाठी) सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहणार आहेत. शेतीशी संबंधित सर्व दुकाने आठवड्याचे सर्व दिवस दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. (Strict Lockdown Again In Satara District From Saturday Satara Marathi News)
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (शनिवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत पुन्हा कडक लॉकडाउन लागू केले आहे.
जिल्ह्यातील सध्या शनिवारी व रविवार वगळता वेळेच्या मर्यादेत दुकाने सुरू होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होऊन पुन्हा वाढू लागला आहे. परिणामी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector Shekhar Singh) उद्या(शनिवार) पासून पुन्हा कडक लॉकडाउन लागू केले आहे. हे लॉकडाउन पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे सातारकरांनी आता घरातच थांबून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. यामध्ये अत्यावश्यक बाबींची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सेतू, आधार नोंदणी केंद्र, चार्टर्ड अकौटंट कार्यालये सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहतील.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक साहित्य घरपोच पुरविण्यास सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत परवानगी असेल. हॉटेल्स, रेस्टारंटस् ही केवळ घरपोच सुविधेसाठी सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग सुविधा पूर्णपणे बंद असेल. मात्र, हॉटेलमध्ये बसण्यास बंदी असणार आहे. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, क्रीडा विषयक बाबी, चालणे व सायकलींगसाठी सकाळी पाच ते नऊ यावेळेत परवानगी दिली आहे. मात्र, शनिवार, रविवारी मनाई असणार आहे. आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरणास परवानगी असेल. तसेच लग्न समारंभास दोन तासाच्या मर्यादेत २५ लोकांच्या उपस्थितीत परवानगी असेल. त्यासाठी तहसिलदारांची परवानगी आवश्यक असेल. २० नातेवाईकांच्या उपस्थितीत दशक्रिया व अंत्यविधीस परवानगी असेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, बैठका, सभांना ५० टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी असणार आहे. मजूरांची राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच बांधकामांना परवानगी असणार आहे. शेतीशी संबंधित सर्व दुकाने दुपारी आठवड्याचे सर्व दिवस सुरू ठेवता येणार आहेत. केश कर्तनालय व सौंदर्य केंद्रे लस घेतलेल्या नागरीकांसाठीच दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सार्वजनिक परिवहन सेवा ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहणार आहे. गॅरेज, स्पेअर पार्ट व पंक्चरची दुकाने केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी चालु ठेवता येणार आहेत. कोरोनाच्या पाचव्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यातून येण्यासाठी पासची आवश्यकता आहे.
वर्तमानपत्रे (Newspaper) घरपोच मिळणार...
लॉकडाउन कडक राहणार असले तरी वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी राहणार आहे. मात्र, त्याचे वितरण केवळ घरपोच करत येणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
हे बंद राहणार
शाळा महाविद्यालये, कोचिंग क्लासेस
मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे
मंदिरे, प्रार्थना स्थळे, करमणूक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, मेळावे
परवानगी नसलेली सर्व खासगी कार्यालये
हे सुरु राहणार
किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी
मटण, चिकन, अंडी, मासे दुकाने
रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक सेवेसाठी
खासगी, सहकारी बँका
सर्व बाजार समित्या सकाळी सात ते दोन
खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठी
खासगी बसेसने आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (50 टक्के प्रवाशी)
पेट्रोल पंप अत्यावश्यक वाहनांसाठी 24 तास सुरू
व्हेटरीनरी हॉस्पिटल, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स
दूध संकलन केंद्रे सकाळी सात ते नऊ व सायंकाळी सहा ते आठ घरपोच सुविधा
कृषी विषयक दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत
शिवभोजन थाळी केवळ पार्सल सुविधा
शीतगृहे व गोदाम सेवा
स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा
भारतीय सुरक्षा मंडळ कार्यालये
टेलिकॉम सेवेतील दुरस्ती व देखभाल
ई-व्यापार
Strict Lockdown Again In Satara District From Saturday Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.