VIDEO पाहा : लॉकडाउनने बदलली शिक्षणाची परिभाषा! वनगळात विद्यार्थिनीची टेरेसवर 'शाळा'

लॉकडाउनने शिक्षणाची परिभाषाच जणू बदलून गेली आहे. शिकण्याच्या संकल्पनाही बदलून गेल्या आहेत.
Student School
Student Schoolesakal
Updated on

नागठाणे (सातारा) : लॉकडाउनने शिक्षणाची (Lockdown Education) परिभाषाच जणू बदलून गेली आहे. शिकण्याच्या संकल्पनाही बदलून गेल्या आहेत. शिक्षणाच्या वाटा धूसर बनत असताना नवे मार्ग चोखाळण्याचा प्रयत्नही सुरू आहे. अशातच ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने घराच्या टेरेसवर स्वयंअध्ययनाची नवी वाट शोधली आहे. (Student School On The Terrace At Vangal Satara News)

जयश्री संजय साळुंखे असे या विद्यार्थिनीचे नाव. ती सातारा तालुक्‍यातील वनगळ या गावची रहिवासी. गोवे येथील श्री कोटेश्वर माध्यमिक विद्यालयात ती शिकते. वनगळ ते गोवे हे तीन किलोमीटरचे अंतर ती पायी ये-जा करते. शेतकरी कुटुंबातील जयश्री ही इयत्ता दहावीत आहे. सध्याच्या लॉकडाउनमुळे तिच्या शाळेची वाट बंद झाली आहे. अर्थात त्यामुळे नाउमेद होऊन ती स्वस्थ बसलेली नाही. आपल्या घराच्या टेरेसवर तिने स्वयंअध्ययनाचा नवा मार्ग शोधला आहे. शाळेच्या उपक्रमशील, कृतिशील मुख्याध्यापिका विभा विजय साबळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन तिला याकामी लाभले आहे. त्यातून टेरेसवर तिने स्वयंअध्ययन शाळा साकारली आहे. त्यात चुन्याच्या साह्याने त्रिकोण, चौकोन, गोल, स्टार, विविध आकाराच्या रेषा आदी चिन्हांचे रेखाटन केले आहे.

भाषा, इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांच्या काही संकल्पना त्यात समावेशित आहेत. इंग्रजीची कठीण स्पेलिंग, व्याकरण, वर्ग, घन, मूलद्रव्ये, संज्ञा, त्यांची रेणूसुत्रे अशा कित्येक संबोधांवर त्यात भर दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे रनिंग, जॉगिंग, जंपिंग, अप-डाउन, पुशअप्स हा व्यायाम करत ती या संबोधांचे दृढीकरण करते. त्यातून व्यायामही होत आहे. शिक्षणही घडत आहे. व्यायामातून शिक्षणाची संकल्पनाही सार्थ ठरत आहे. संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव, सचिव तुकाराम जाधव, भुजंगराव जाधव, सर्व संचालक तसेच तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख अंकुश जुनघरे, सर्व शिक्षक, ग्रामस्थांनी जयश्रीच्या या अनोख्या अध्ययनशीलतेचे कौतुक केले आहे.

बदलत्या प्रवाहानुसार शिक्षणही बदलत आहे. त्याला सामोरे जात जयश्री कल्पकतेने शिक्षणाचे धडे गिरवत आहे. सतत घरात बसून येणारा कंटाळाही त्यामुळे दूर होत आहे. तिच्या शिकण्याचा हा प्रवास कौतुकास्पद आहे.

-विभा साबळे, मुख्याध्यापिका, श्री कोटेश्वर माध्यमिक विद्यालय, गोवे

Student School On The Terrace At Vangal Satara News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()