बचतीतून व्यवसाय करत स्वावलंबी; १२ महिलांचे वेगवेगळे व्यवसाय

साताऱ्यातील नवचैतन्य बचत गटातील १२ महिलांचे वेगवेगळे व्यवसाय
success story Navchaitanya Bachat gat Satara 12 different business of women
success story Navchaitanya Bachat gat Satara 12 different business of womensakal
Updated on
Summary

शहरी भागातील महिलाही या बचत गट चळवळीत खूपच सक्रिय आहेत. वेगवेगळ्या गाव, जिल्ह्यातून साताऱ्यात आलेल्या बारा जणी एकत्र आल्या. नवचैतन्य बचत गटाची स्थापना करत छोटे-मोठे व्यवसाय उभारत स्वावलंबी होत आहेत. त्यासाठी त्यांनी कधीच बँकेचे कर्जही घेतले नाही. फक्त बचतीतून त्यांनी मोठे भांडवल उभे केले आहे.

वेगवेगळे स्वभाव आणि हूनर घेऊन कोणी उपजीविकेसाठी, तर कोणी मुलांच्या शिक्षणासाठी साताऱ्यामध्‍ये आलेल्या १२ महिला ओळखीनंतर मैत्रीच्या धाग्यात बांधल्या गेल्या. प्रथम बचत हा उद्देश ठेऊन २००५ मधे १२ महिलांनी नवचैतन्य गटाची स्थापना केली. सुरवातीला त्या दरमहा फक्त १०० रुपये बचत करत होत्या. बचत केलेल्या पैशातून गटाकडून कर्ज घेऊन आपल्या कौशल्यानुसार त्या व्यवसाय करू लागल्या. त्यामध्ये लता चव्हाण या टेलरिंगचे शॉप चालवत होत्या. त्यासोबत बचत गटाचे कर्ज घेऊन मशिन दुरुस्ती व विक्री आणि पेपर आर्टमधील गजरे, वेणी, हार बनवण्याचा व्यवसायही त्यांनी सुरू केला.

आज त्यांचे गजरे, वेणी स्थानिक बाजारपेठ आणि ऑनलाइन मार्केटिंग करत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर जात आहेत. सुजाता कोकीळ यांनी बांगडी व्यवसाय व त्यासोबत सौंदर्यप्रसाधने करण्याच्या व्यवसायाची उभारणी केली. माधुरी कलघटगी यांनी सुवर्णकारासोबत टेलरिंग मटेरियल विक्री सुरू केली. सुनीता लोहार या उत्तम विणकाम करतात. त्यांनी बचत गटातून भांडवल घेऊन कलात्मक उबदार कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. आता त्या मोठ्या प्रमाणात लोकरीचे स्वेटर, फ्रॉक आणि शोपीस तयार करून विक्री करतात. सुनंदा खामकर यांनी गटातून कर्ज घेऊन किराणा दुकान व कटलरी शॉप चालू केले आहे. अलका चव्हाण यांनी कटलरी शॉप चालू केले आहे. इतर सभासद संगीता पिंपळे, नीता बाबर, संगीता कारंडे या वेळोवेळी सगळ्यांना मदत करतात. शोभा तावरे या कांदे-बटाटे विक्रीचा व्यवसाय करतात.

रजनी खराडे या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक आहेत. ॲवॉर्ड या सामाजिक संस्थेला गट जोडला गेल्यामुळे गटाच्या सदस्या व ‘ॲवॉर्ड’ संस्थेच्या सचिव नीलिमा कदम यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.

नवचैतन्य बचत गटाच्या माध्यमातून सभासदांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. व्याज व परतफेड प्रत्येक महिन्यात करण्याचा नियम आहे. प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला गटाची मीटिंग होते. शिस्त लगण्यासाठी गैरहजर सदस्याकडून दंड वसूल केला जातो. आमच्या सदस्यांमध्‍ये एकजूट आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्यामुळे आमचा बचत गट म्हणजे एक कुटुंब झाले आहे.

- रजनी खराडे, अध्यक्ष, नवचैतन्य बचत गट, सातारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()