यशोगाथा बचत गटाची... खंडाळ्याच्या माळावर महिलांची फुलशेती

पळशी येथील महिला शेतकरी गटाचा नावीन्यपूर्ण उपक्रम; माळरानावर शेडनेटमध्ये उत्पादन
Success story of Bachat Gat Women flower cultivation Khandala hill satara
Success story of Bachat Gat Women flower cultivation Khandala hill satarasakal
Updated on

खंडाळा तालुका तसा दुष्काळी. बहुतेक शेती कोरडवाहू. अशा शेतीत कष्ट करण्याचे नशिबी आले असले तरी येथील माणसं कधी डगमगली नाहीत. महिला शेतकरीही त्यांच्याबरोबरीने कष्ट करतात. पण, बचत गट चळवळ आली आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीच्या इच्छा, अपेक्षेला आशेचे घुमारे फुटू लागले. महिला मिळेल तेथून माहिती घेत बचत गट चळवळीत सहभागी होऊ लागल्या आणि जिद्दीने त्यात यशस्वी होऊ लागल्या. एवढ्या की पळशी येथील सारिका जाधव आणि त्यांच्या सहकारी महिलांनी स्थापन केलेला कृषी जिव्हाळा महिला शेतकरी बचत गट आता पळशीच्या माळरानात जरबेरा, गुलाबासह विविध प्रकारच्या फुलांची शेती फुलवत आहेत. सारिका जाधव यांनी आपल्या गावातील समविचारी शेतकरी महिलांना एकत्रित करून ॲवॉर्ड संस्थेच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१९ मध्ये कृषी जिव्हाळा महिला शेतकरी गट स्थापन केला. महिलांना सोबत घेऊन शेडनेटमधील फुलशेती हा नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे.

शिरवळ परिसरात गोदरेज अँड बॉईस मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनी लिमिडेड यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत शिरवळ परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि सेंद्रिय शेती पध्दतीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम ॲवॉर्ड संस्थेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी महिलांना सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण, शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण व प्रकल्प उभारणीची माहिती दिली. सारिका जाधव, वैशाली भरगुडे यांनी पुढाकार घेतला. स्थापन केलेल्या गटाची नोंदणी ‘आत्मा’ विभागात केली. गट स्थापनेनंतर गटाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे महिलांचा कल असल्याने संस्थेने शेडनेटमधील फुलशेती व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा केली. महिलांनी फुलशेती करण्याचे ठरविले. पाच गुंठे क्षेत्रावर शेडनेट आणि त्यामधील फुलशेती करण्यासाठी तीन लाखांहून अधिक खर्चहोता. गोदरेज कंपनीच्या सामाजिक दायित्व उपक्रमातून मदत केली. दीड लाखांहून अधिक रक्कम महिलांनी स्वतः उभारली.

महिलांचा उत्साह आणि चिकाटी पाहून सारिका जाधव यांचे पती बाबू जाधव यांनी आपली पाच गुंठे शेतजमीन नाममात्र दराने भाडेतत्त्‍वावर गटास उपलब्ध करून दिली आहे. महिलांनी उपलब्ध निधीतून शेडनेटची उभारणी करून यात गुलाब, निशिगंध, जरबेरा, शेवंती, झेंडू, मोगरा अशा विविध प्रकारच्या आणि स्थानिक बाजारात मागणी असलेल्या फुलांच्या रोपांची लागवड केली. या फुलांसाठी शिरवळ आणि खंडाळा येथील स्थानिक बाजारात ही फुले फुलविक्रेत्यांच्या माध्यमातून विकण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. या कामात अध्यक्ष सारिका जाधव, सचिव सीमा भरगुडे, सदस्य मनीषा गर्जे, सुप्रिया शेटे, वैशाली भरगुडे या आता आधुनिक तंत्रज्ञान फुलशेतीत राबत असून, त्यांच्या कष्टाला यशाचा सुगंध लाभला असून, त्या स्वावलंबनातून विकासाच्या वाटेवर वाटचाल करत आहेत.

आम्ही बचत गटात सर्व शेतकरी कुटुंबातील महिला आहोत. शेतीतच वेगळे प्रयोग करून नक्कीच आर्थिक उन्नती साधता येईल, हा आम्हाला विश्वास होता. आता आम्ही साऱ्याजणी रोपांची आणि फुलांची मुलांसारखी काळजी घेत आहोत. बचत गट चळवळीने आम्हाला हा स्वभिमानाचा मार्ग दिला आहे.

-सारिका जाधव, अध्यक्षा, कृषी जिव्हाळा महिला शेतकरी बचत गट, पळशी, ता. खंडाळा

पळशी (ता. खंडाळा) येथील महिलांनी एकत्र येत शेतकरी महिलांनी बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी चक्क माळरानावर शेडनेटमध्ये फुलशेती फुलविली आहे.

-दिलीपकुमार चिंचकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()