धरणग्रस्ताचा मुलगा बनला राज्याचा मुख्य अभियंता

Chief Engineer Santosh Shelar
Chief Engineer Santosh Shelaresakal
Updated on

सातारा : खरे तर धरणाच्या (Dam) बांधकामामुळे त्यांचे सारे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. घर, शेती धरणात गेली. त्या वेळी ते लहान होते; पण साऱ्या कुटुंबाची झालेली वाताहात त्यांनी पाहिली होती. त्या लहान मुलाने त्या वेळीच मनाशी जिद्द बाळगली होती मोठे होण्याची, काही तरी करून दाखवून कुटुंबाला ऊर्जितावस्था आणण्याची. या जिद्दीतून वारकरी असलेल्या एका धरणग्रस्ताच्या मुलाने राज्याच्या मुख्य अभियंतापदाला गवसणी घातली असून, भिवडी (ता. कोरेगाव) येथील संतोष शेलार (Santosh Shelar) यांनी कष्टातून उत्तुंग यश मिळविले आहे.

Summary

खरे तर धरणाच्या बांधकामामुळे त्यांचे सारे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. घर, शेती धरणात गेली. पण..

महाराष्ट्र लोकसेवा आयोग इंजिनिअर सर्व्हिसेस परीक्षा २००० च्या बॅचचे कार्यकारी अभियंता संतोष गजानन शेलार यांची सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता पदावर पदोन्नती झाली आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. भिवडी ग्रामस्थांनी पेढे, साखर वाटून आनंद व्यक्त केला. शेलार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील भिवडी (ता. कोरेगाव) या गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील गजानन शेलार हे धरणग्रस्त शेतकरी. ते वारकरीही आहेत. त्यांना धरणामुळे विस्थापित व्हावे लागले होते. मात्र, त्या वेळच्या हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांचा मुलगा संतोष हा लहानपणापासून हुशार होता. त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे आर्थिक स्थिती हलाखीची असली, तरी आयुष्यात मोठे यश मिळवण्याचे स्वप्न त्यांनी लहान वयातच पाहिले होते.

Chief Engineer Santosh Shelar
कऱ्हाडकरांनी अनुभवला पहाटेपासून सहा तासांचा 'High-Voltage' ड्रामा

घरच्या गरीब परिस्थितीला तोंड देत त्यांनी आपले प्राथमिक, माध्यमिक शिक्षण चांगल्या मार्कांनी पूर्ण केले. त्यांनी इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घ्यायचे होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण सोडून देण्याचा निर्णय शेलार यांनी घेतला होता; परंतु शेलार यांची बौद्धिक क्षमता व अभ्यासूवृत्ती लक्षात घेऊन साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तत्कालीन प्रा. के. एस. शेख, प्रा. व्ही. एस. चिरमुले, प्रा. एस. एम. गोपाल यांनी शेलार यांची परिस्थिती महाविद्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक ठिकाणांवरून मदत मिळाल्याने शेलारांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले. शेलार हे पदविका (डिप्लोमा) परीक्षेत राज्यात दुसरे व पदवी (बी. ई.) परीक्षेत पुणे विद्यापीठात दुसरे आले होते. पुढे त्यांनी एम. ई. (स्ट्रक्चर) परीक्षेत पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या प्राध्यापकांनी व महाविद्यालयाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. मात्र, ते एवढ्यावर थांबले नाहीत. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग इंजिनिअर सर्व्हिसेस परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन थेट कार्यकारी अभियंता पदावर त्यांची निवड झाली. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करून २००२ मध्ये त्यांनी कार्यकारी अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारला अन् त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. २०१५ मध्ये त्यांची अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती झाली. नांदेड व सोलापूर सर्कलमध्ये अधीक्षक अभियंता म्हणून काम करताना अभ्यासू, प्रामाणिक, कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. नुकतीच शासनाने त्यांना मुख्य अभियंता पदावर बढती देऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाची जबाबदारी सोपवली. केवळ ४५व्या वर्षी शेलार यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.

Chief Engineer Santosh Shelar
केंद्र सरकारमुळे राज्यातील कारखाने अडचणीत

मुख्य अभियंतापदाला गवसणी घालणाऱ्या या सुपुत्राचा सातारकरांना सार्थ अभिमान असल्याची भावना कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनेक माजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, नगरविकास व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार रणजित मोहिते पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार, रणजित देशमुख, मृणाल पाटील, चंद्रकांत चव्हाण, अनिल देसाई, मनोहर शिंदे, शिवराज मोरे आदींनी शेलार यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.