मृत्यू समोर दिसत होता, पण अर्धांगिनीने किडनी देऊन वाचविले 'सौभाग्य'; शेख दांपत्‍यावर यशस्वी शस्त्रक्रिया

कोरोनात आयुष्य जगताना प्रचंड सकारात्मक असणारा इम्तियाज पॉझिटिव्ह आले. त्यांचे क्रिएटिन वाढले. डायलिसिस करावे लागले.
Sheikh couple from Khatav Satara
Sheikh couple from Khatav Sataraesakal
Updated on
Summary

पतीची किडनी बदलली तरच त्याचा जीव वाचणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नूरजहाँ यांचे डोळे डबडबले; पण दुसऱ्याचं क्षणाला पदराला डोळे पुसत निर्धार केला.

खटाव : पती टेलर... तीन वर्षांपूर्वी त्याला कोरोना (Corona) झाला. क्रिएटिन वाढले. तब्येत ढासळली. दोन्ही किडन्या (Kidney) निकामी झाल्या. तीन वर्षे डायलिसिस सुरू होते. मात्र, तब्येत ढासळत चालली होती. किडनी दाता मिळत नसल्याने त्यांचा जीव धोक्यात आला. अशावेळी ती पुढे आली आणि पतीला किडनी देऊन त्याचे प्राण वाचविण्यात ती यशस्वी झाली.

ही घटना आहे खटाव येथील इम्तियाज शेख (Imtiaz Shaikh) आणि नूरजहाँ शेख (NoorJahan Sheikh) या दांपत्याची. त्या दोघांचीही प्रकृती सुधारत आहे. खटाव येथील सोमनाथनगर येथे इम्तियाज शेख कुटुंब वास्तव्यास आहे. इम्तियाज शेख टेलर काम, तर नूरजहाँ खासगी रुग्णालयात सेवा करते. कोरोनात आयुष्य जगताना प्रचंड सकारात्मक असणारा इम्तियाज पॉझिटिव्ह आले. त्यांचे क्रिएटिन वाढले. डायलिसिस करावे लागले.

Sheikh couple from Khatav Satara
Udayanraje Bhosale : जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; प्रभू श्रीरामांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक

दरम्यान ‘शुगर’ वाढली. त्याची तब्येत ढासळली. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. किडनी बदलली तरच त्याचा जीव वाचणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नूरजहाँ यांचे डोळे डबडबले; पण दुसऱ्याचं क्षणाला पदराला डोळे पुसत निर्धार केला. कितीही अडथळे आले तरी प्रयत्न सोडणार नाही. तब्बल तीन वर्षे डायलिसिस करण्यात आले; पण मृत्यू समोर दिसत होता.

Sheikh couple from Khatav Satara
Textile Industry : इचलकरंजीतील 'पॉवरलूम मेगा क्लस्टर'ला भांडवली अनुदान; वस्त्रनगरीत तब्बल 400 उद्योगांना होणार फायदा

पतीची वेदना, तडफड त्यांना बघवत नव्हती. जीव कासावीस होत होता. नूरजहाँ यांनी सासर अन् माहेरच्या माणसांना विश्वासात घेत स्वत:ची किडनी पतीला देण्याचा निर्णय सांगितला. मुंबईत पोलिस दलात अधिकारी असलेले अकबर पठाण यांनी मुंबईत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया ठरली. दिवस ठरला. नूरजहाँ यांनी पती, मुलांना डोळ्यात साठवलं अन् थेट ऑपरेशन थिएटर गाठलं. नूरजहाँ यांची सैफी हॉस्पिटल (चर्नी रोड) येथील डॉ. युसूफ सैफी यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली, तर डॉ. आशिष रावल यांनी नूरजहाँ यांची किडनी इम्तियाज यांना बसवली.

इम्तियाज आणि नूरजहाँ शेख याची प्रकृती सुधारत आहे. नूरजहाँ यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श आपल्या कृतीतून ठेवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता निर्णय घेण्याची क्षमता अन् धाडस दाखवले आहे. प्रचंड साहस, पतीवरचं नितांत प्रेम अधोरेखित करत आपल्या जिवाची बाजी लावत पतीला जीवदान दिले.

Sheikh couple from Khatav Satara
Annual Horoscope 2024 - सिंह रास : जीवनाला कलाटणी अन् भाग्योदयाची संधी; वर्षभरात कसं असेल आपलं 'राशिभविष्य'

माझ्या पत्नीचे ऋण मला आयुष्यभर न फेडण्याजोगे आहेत. तिच्यामुळेच मी पुढील आयुष्य सुखा समाधानाने जगणार आहे. तिच्यामुळे मला जगण्याची नवीन ऊर्जा मिळाली. मी डॉक्टर व माझ्या पत्नीचा आभारी आहे.

-इम्तियाज शेख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()