मुलांसाठी दिला जाणारा सुटीतील गृहपाठ साऱ्यांनाच ठाऊक असतो. इथे मात्र, सुटीतील गृहपाठ आहे तो पालकांसाठी. हा गृहपाठ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
नागठाणे - मुलांसाठी दिला जाणारा सुटीतील गृहपाठ साऱ्यांनाच ठाऊक असतो. इथे मात्र, सुटीतील गृहपाठ आहे तो पालकांसाठी. हा गृहपाठ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. ‘सोशल मीडिया’वरूनही तो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.
वाय. आर. निकम हे सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथील सेवानिवृत्त अधिकारी. शिक्षण क्षेत्रातील उच्च पदावरून ते निवृत्त झाले आहेत. एक अभ्यासू, चिंतनशील, संवेदनशील विचारवंत म्हणून ते महाराष्ट्रभर ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात पालकांसाठी एक संदेश लिहिला. ‘पालकांसाठी सुटीतील गृहपाठ’ हा या संदेशाचा मध्यवर्ती आशय. हा संदेश त्यांनी ‘सोशल मीडिया’वर शेअर केला. तो सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा गृहपाठ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लवकरच मुलांना सुट्या पडतील. अशा दिवसांत मुले अन् पालक यांच्यातील नात्याच्या दृष्टीने या गृहपाठाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
असा आहे गृहपाठ...
रोज सकाळ- संध्याकाळचे जेवण मुलांसमवेत गप्पा मारत करा.
अन्न वाया न जाऊ देण्याची, पानात न टाकण्याची सवय लावा.
मुलांची ताट- वाटी त्यांनाच स्वच्छ करायला लावा. त्यातून आईचे श्रम समजण्याबरोबर स्वावलंबनाची सवय लागेल.
भाजी निवडणे, चिरणे, खोल्या झाडणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या.
आपले शेजारी आणि आपण यांची परस्परांशी जवळीक वाढण्यास प्रवृत्त करा, कारण तेच संकटसमयी प्रथम मदतीला येतात.
मुलांना आजी- आजोबांसोबत गप्पा मारू द्या. त्यांचे एकत्र फोटो काढा.
आपल्या कामाच्या ठिकाणी मुलांना न्या. म्हणजे आपण कोणत्या प्रकारचे काम करतो, किती कष्ट करतो, याची जाणीव मुलांना होईल.
यात्रा, बाजार येथे मुलांना घेऊन जा.
आपल्या लहानपणीच्या आठवणी त्यांना सांगा. पूर्वजांची गौरवशाली माहितीही सांगा.
मुलांच्या प्रश्नांची उत्तरे सांगा. त्यांना बोलके करा. सहजसंवाद अनौपचारिकपणे सतत होऊ द्या.
मुलांच्या इयत्तेनुसार त्यांना विशेष ताण न देता, थोडा; परंतु नियमित अभ्यास करण्यास प्रोत्साहित करा.
मुलांना सुटीत भरपूर खेळू द्या. यात कपडे मळले तरी चालतील. ती पडली, थोडे लागले तरी चालेल.
मुलांना त्यांच्या पाठ्यविषयाशिवाय एक तरी वेगळे पुस्तक विकत घेऊन द्या आणि ते वाचण्यास प्रवृत्त करा.
मुलांसमोर मोबाईल वापर कमी करा.
आपल्या मुलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.