सातारा : राजकीय नेते असो किंवा प्रशासक जनतेची नाडी ओळखणारे नेहमी चांगला कारभार करण्यात यशस्वी झाल्याचे आजवर अनेकांच्या कार्यातून समोर आले आहे. त्यातून लोकांचे प्रश्न सुटण्यासही मदत झाली आहे. याच कार्यपद्धतीचा अवलंब पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडून अवलंबिला जात आहे. छत्रपतींच्या राजधानीत त्यांनी दाखविलेल्या मार्गाने जात रात्री- अपरात्री साध्या वेशात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतानाच ते पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नजर ठेवत आहेत. त्यामुळे गुन्हेगार असो वा पोलिस सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्यांनी सावध राहा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा ही लोकशाहीतील महत्त्वाची अंग आहेत. या दोघांच्या कार्यपद्धतीवरच सर्वसामान्य नागरिकांचे बहुतांश दैनंदिन जीवन कसे राहील, हे अवलंबून असते. त्यामुळे या दोन्ही घटकांच्या खांद्यावर अगदी तळागाळातील लोकांना त्रास होऊ नये, त्यांचे प्रश्न सुटावेत याची जबाबदारी असते. ही जाणीव असणारा राज्यकर्ता व प्रशासकीय अधिकारीच योग्य काम करून जनतेच्या मनावर गारूड घालण्यात यशस्वी होतो. आजवर नावाजलेल्या अनेक राज्यकर्ते, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीवरून हे स्पष्ट होते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजही राज्यकारभाराची घडी, त्याचा लोकांवर होणारा परिणाम याची माहिती घेण्यासाठी साध्या वेशात रयतेत फिरत असल्याचे अनेक दाखल्यांमधून सांगितले गेले आहे. स्वराज्याच्या राजधानीतही आता त्याच बाबींची पुनरावृत्ती होत आहे.
वॉर्ड रचनेनूसार पालिकांच्या निवडणुकांसाठी लगीनघाई सुरु
'श्रीं'चा पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून; गोंदवले यात्रेची संभ्रमावस्था
पोलिस अधीक्षक हा जिल्ह्याच्या प्रशासनातील एक महत्त्वाचा अधिकारी असतो. जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे काम त्यांना करावे लागते. त्यासाठी त्यांच्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी कुमक असते; परंतु ती प्रमुख अधिकाऱ्याच्या विचाराशी, त्याने दिलेल्या निर्देशांशी सुसंगत चालली तरच कायद्याचे राज्य निर्माण होते. लोकांमध्ये त्या कामाची काय चर्चा आहे, लोक त्याकडे कसे पाहतात, कोणत्या गोष्टीची कमतरता आहे हेही जाणून घेणे महत्त्वाचे असते. आजवरच्या पोलिस अधीक्षकांकडून आपापल्या पद्धतीने ते काम होतच होते; परंतु साध्या वेशात थेट लोकांच्यात मिसळूनच परिस्थिती जाणून घेण्याचे काम पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडून केले जात आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीची साताऱ्यातील अनेकांना प्रचिती येऊ लागली आहे. थेट पोलिस अधीक्षकच आपल्यात येतोय, आपल्याला मदत करतोय हे पाहून सातारकरांना सुखद धक्का बसत आहे.
महाबळेश्वर, पाचगणीत नाईट पार्ट्या, ऑर्केस्ट्रा, हॉटेलिंगचा धिंगाणा नाही चालणार : जिल्हाधिका-यांचा आदेश
शेकोटीच्या गप्पा अन् प्रवाशाला मदत
साताऱ्यातील असाच एक जण या आठवड्यात पहाटे सव्वादोनच्या सुमारास लातूरहून मुख्य बस स्थानकावर आला. त्यांना मंगळवार तळ्यावर जायचे होते. मुख्य बस स्थानकावरील रिक्षाचालकांकडून रात्री मागितल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा भाड्याची त्यांना कल्पना होती. म्हणून ते पायची चालत पोवई नाक्याकडे निघाले. तेथे काही लोक शेकोटी पेटवून शकत बसले होते. त्यांच्या शेजारी एक माणूस त्यांच्यातलाच एक होऊन बोलत बसला होता. त्या व्यक्तीला पायी जाताना पाहून त्यांनी थांबविले. "कुठे जायचेय' अशी विचारणा केली. त्यानंतर "चला मी सोडतो' म्हणत त्याला बुलेटवर घेतले. वाटेतील चर्चेत त्या माणसाची माहिती जाणून घेतली. त्याला त्याच्या घराजवळ सोडले. बोलण्याच्या ओघात शेवटी "मला सातपुते मॅडमना भेटायचे होते,' असे सातारकर म्हणाला. त्या वेळी त्यांची बदली झाली. मीच त्यांच्या जागी आलोय, असे बुटेलस्वाराने त्यांना सांगितले. त्यामुळे थेट एसपींनीच आपल्याला मदत केल्याचा सुखद धक्का त्याला बसला. त्यामुळे साताऱ्यातील गुन्हेगार व पोलिसांनी यापुढे सावध राहावे लागणार आहे. अधीक्षकांच्या या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेत नक्कीच फरक पडू शकतो.
शिष्यवृत्तीच्या बहाण्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना गंडा!
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.