कोरोनाचा कहर कमी होत असला तरी त्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही.
सातारा : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होत असला तरी त्या प्रमाणात लसीकरण (Corona Vaccination) झालेले नाही. आगामी काळात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) असून, या वेळी लस न घेणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे (Social worker Sushant More) यांनी पत्रकाव्दारे केली आहे. याबाबतचे निवेदन ते जिल्हाधिकारी कार्यालयास देणार आहेत.
मोरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाने मानवाचे अस्तित्व संकटात आले असताना प्रतिबंधक लसीकरणामुळे तो धोका कमी झाला आहे. लसीकरणामुळे किमान मृत्यूदर कमी येत असल्याने देशभरात शासनाने मोठ्या प्रमाणावर आरोग्य आणि अन्य यंत्रणेच्या साह्याने लसीकरणाचे दिव्य लीलया पेलले आहे. तरीही अनेकांनी लसीकरण करून घेतलेले नाही.
सध्या सहज लस उपलब्ध होत असून त्यासाठी सतत प्रबोधन केले जाते. तरीही अजूनही लसीकरणाचा मोठा टप्पा गाठायचा आहे. यासाठी आगामी जिल्हा बँक, नगरपालिका, नगरपरिषद, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीत लस घेतली तरच मतदानाचा अधिकार बजावता येईल, असे धोरण शासनाने आखण्याची गरज असल्याचे मत मोरे यांनी पत्रकात व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.