सातारा : लॉकडाउनमधील घरगुती वीजबिले माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार (ता. १९) वीज वितरणच्या कृष्णानगर येथील कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले. सातारा-पंढरपूर महामार्गावर रास्ता राेकाे केल्याने वाहतुक काही काळ खाेळंबली.
लॉकडाउनच्या काळातील घरगुती वीजबिले माफ करा, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) राज्यात आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. त्यानूसार सातारा येथील संघटनेने आंदाेलन केले. दरम्यान आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यावेळी आंदाेलकांनी राज्य सरकारचा निषेध केला. राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र वीजबिलात सवलत द्यायला पैसे नाहीत हा काेणता न्याय असे संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी नमूद केले.
सातारा : लग्न लावून देतो सांगून दोघांनी महिलेस लुबाडले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.