Bavdhan News : खोटे गुन्हे दाखल करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा; पोलिस अधीक्षक समीर शेख यांना वाईकरांचे निवेदन

खोटे गुन्हे दाखल करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांना वाईकरांचे निवेदन.
police
policeesakal
Updated on

बावधन - तालुक्यात जातीय व सामाजिक तेढ निर्माण करून अनेकांवर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच शहरातील सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन आज वाईतील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना दिले.

गेल्या सोमवारी (ता. १८) रात्री आठ वाजता शहरातील बावधन नाका परिसरात सारंग ज्ञानेश्वर माने व इतर यांच्यामध्ये गोंधळ सुरू होता. त्यावेळी वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रितसर तक्रारी घेऊन संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेतील सारंग माने हा तडीपार व सराईत गुन्हेगार आहे.

त्याने झालेल्या प्रकारानंतर या प्रकारास गंभीर गुन्ह्याचे स्वरूप यावे तसेच खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या हेतूने जातीय रंग येण्याकरीता हेतू स्वतःहुन शरीरावर जखमा करून सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. या प्रकाराबाबत रिपाईच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी सोशल मीडियावर चुकीची वक्तव्ये करून घटनेशी संबंध नसणा-यांची नावे घेवुन त्यांची नाहक बदनामी केली.

त्यामुळे त्यांनी समाजा समाजात तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला दिसुन येत आहे. तसेच खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

सारंग माने यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यास तडीपार केले होते. त्यानंतर तालुक्यामध्ये दहशत माजवण्याकरीता काही महिन्यांपुर्वी महागणपती पुलावर पर्यटकांच्या वाहनांची नासधूस करून त्यांना मारहाण केली होती. त्याचा साथीदार किरण घाडगे यांच्यावरही जागेच्या कारणावरून मानकुंबरे कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात होता.

तो ही जामीनावर बाहेर आल्यापासून मानकुंबरे कुटुंबिय यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील दिवसांमध्ये गुन्हेगारी व समाजकंटकांवर केलेल्या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्यावर संबंधित चिडून आहेत.

या पार्श्वभूमीवर सारंग माने, किरण घाडगे व इतर हे झालेल्या घटनेचे भांडवल करून तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यक्ती, मानकुंबरे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर जाणीवपुर्वक खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याबाबतची सत्यता पडताळून घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

तसेच संजय गाडे व त्यांचे साथीदार तालुक्यात जातीय व सामाजिक तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून या प्रकारातुन संरक्षण सामान्य नागरीकांना योग्य न्याय दयावा, अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटना, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह्या असून सर्वजण उपस्थित होते.

काही लोक खोटे व चुकीचे

गुन्हे युवकांवर दाखल करण्याच्या प्रयत्न करीत असून त्यासाठी पोलिसांवर दबाव आणत आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना साताऱ्यात प्रत्यक्ष भेटून वाईकर नागरिक व व्यापारी यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान समाजाला वेठीस धरून शहरातील सामाजिक स्वास्थ्य व वातावरण बिघडवू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २५) नागरिकांच्या वतीने सकाळी दहा वाजता महागणपती घाटावरून किसनवीर चौक मार्गे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब भालचिम यांना निवेदन यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी मोर्चात व्यापारी व सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.