सातारा : कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे, तर पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये व्दिधा मनस्थिती आहे. त्यामुळे येथून पुढचा शैक्षणिक काळ कसा राहणार याबाबतही विद्यार्थ्यांसह पालकांनी चिंतन करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटाला न घाबरता धिटाईने या रोगाचा सर्वांनी सामना केला पाहिजे. या महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्राला देखील आर्थिक मंदीचा फटका बसला असून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे मोठे नुकसान झाल्याचे ज्येष्ठ कर सल्लागार अरुण गोडबोले यांनी सांगितले. ते ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नाॅलाॅजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
गोडबोले पुढे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी देखील तात्पुरत्या स्वरुपाचा विचार न करता दिर्घकालीन विचार करणे आवश्यक आहे, जेणे करुन पुढेचे भवितव्य सुधारता येईल. संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट ओढावलं आहे. मात्र, यावरती मात करत जगलं पाहिजे. आज खासगी संस्थांचं महत्व देखील अधोरेखित झालं आहे. खासगी संस्थांच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थ्यांनी आपलं भवितव्य घडवलं आहे. आज विविध क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. कारण, त्यांची शिक्षणाविषयी असलेली धडपड, तळपळ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पण, या कष्टकरी मुलांना आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव असणंही गरजेचे आहे. पालकांना तुमच्या यशातून मोबदला मिळवून दिला पाहिजे, त्यातच त्यांचं संमाधान आहे.
सध्या नोक-या मिळतील की, नाही याची शाश्वती नाही. पण, विद्यार्थ्यांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणून कोणतही काम करत असताना कष्टाची लाज वाटता कामा नये, कारण कष्ट केल्याशिवाय कोणतही यश प्राप्त होत नाही. विद्यार्थ्यानीही पूर्ण क्षमतेने शिक्षण क्षेत्रात उतरले पाहिजे आणि त्यात उज्वलं यश संपादन केले पाहिजे. कधी-कधी प्राध्यापक, शिक्षकांच्या बाबतीत असं घडत असतं की, नोकरी मिळाली की आपलं अध्यायन संपलं. मात्र, शिक्षणार्थींनी असं न करता विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढवलं पाहिजे. त्याबरोबरच शिक्षण पध्दतीच्या बाबतीतही पूनर्विचार होणे आवश्यक होणे गरजेचे आहे.
शिक्षणाच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, कारण हे खूप धोकादायक आहे. यातून विद्यार्थीवर्गाचे मोठे नुकसान होऊ शकते. याचा शिक्षकांबरोबरच राजकीय नेते मंडळींनी देखील विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी कष्ट करत शिक्षण घेतले पाहिजे. समर्थ म्हणतात, चातुर्य शुंगार अंतर, वस्त्रे शुंगारे शरीर.. केवळ बाह्य गुणांनी संपन्न असून चालत नाही तर अंतर गुणांनी देखील समृध्द असलं पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान असणे आवश्यक नाही, तर सामान्य ज्ञान देखील उपयुक्त आहे. सर्वच त-हेचे ज्ञान अवगत असलं पाहिजे. संवाद कौशल्य याचं ज्ञान पारंगत असणे जरुरीचे आहे. हे मी सगळं काही आपणास सांगतोय, याचं कारण म्हणजे स्वानुभव.. मी देखील असाच घडल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.