Satara School : मुलाला शिक्षा केली म्हणून शाळेत घुसून पालकाकडून शिक्षकाला बेदम मारहाण

एका शाळेत विद्यार्थ्याच्या पालकाने शिक्षकाला (Teacher) मारहाण केल्यामुळे गोंधळ उडाला होता.
Somwar Peth School Satara Shahupuri Police
Somwar Peth School Satara Shahupuri Policeesakal
Updated on
Summary

रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी पोलिस (Shahupuri Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

सातारा : येथील सोमवार पेठेतील एका शाळेत विद्यार्थ्याच्या पालकाने शिक्षकाला (Teacher) मारहाण केल्यामुळे गोंधळ उडाला होता. संबंधित शिक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Somwar Peth School Satara Shahupuri Police
Chiplun Accident : मोठी दुर्घटना टळली, पण..; उड्डाणपुलाचे 25 गर्डर तुटून तब्बल 15 कोटींचं नुकसान, नेमकं काय घडलं?

सोमवार पेठेतील शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षक गेले चार दिवस विविध कारणांवरून समज देत होते. त्यातूनच एका शिक्षकाने त्याला शिक्षा केली. याचा राग मनात धरून काल सकाळी शाळा भरताना संबंधित मुलाचे पालक गोंधळ करत शाळेत शिरले.

शाळेतील पर्यवेक्षक कक्षासमोर आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. योगायोगाने पहिला तास नसल्यामुळे संबंधित शिक्षक तिथेच होते. विद्यार्थ्याच्या पालकाने संबंधित शिक्षकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट समोर आल्यावर शाळेतील अन्य शिक्षक व उपस्थित पालकांनी शिक्षकाला त्यांच्या तावडीतून सोडवले.

Somwar Peth School Satara Shahupuri Police
पश्चिम घाटातील 28 नद्यांची उगमस्थाने धोक्यात; भूगर्भातील जलप्रवाहांवर मोठा परिणाम, संकटं निर्माण होण्याची शक्यता!

त्यानंतर संबंधित शिक्षकाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मार लागला असल्यामुळे पोलिसांनी संबंधित शिक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथे त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. दरम्यान, या प्रकाराची माहिती समजल्यानंतर शाळेत पालकसंघाची बैठक झाली. त्यामध्ये या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

Somwar Peth School Satara Shahupuri Police
Gopichand Padalkar : 'डॉ. आंबेडकरांनी आम्हाला आधीच आरक्षण दिलंय, त्याच्या आडवं येणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही'

कोणत्याही शिक्षकाला अशाप्रकारे मारहाण होता कामा नये, काही तक्रारी असल्यास त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करता येऊ शकते. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी पोलिस (Shahupuri Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.