अपूर्ण कागदपत्राच्या आधारे महिला अधिकार्‍याची बदनामी : तहसीलदार माने

अपूर्ण कागदपत्राच्या आधारे महिला अधिकार्‍याची बदनामी : तहसीलदार माने
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : अपूर्ण माहितीच्या आधारावर महिला अधिकार्‍यांची बदनामी करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न संजय भोसले यांचा सुरु आहे. संबंधित वाहनावर कारवाई सुरु असून ते वाहन प्रशासनाच्या ताब्यात आहे, अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे माणच्या तहसीलदार बाई माने यांनी दिली.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी शुक्रवार 9 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेवून प्रशासनावर आरोप केले होते. त्याआधारे आज (ता. १०) 'वाळूचा ट्रक कारवाईविना सोडला कोणी? भोसले' या मथळ्याखाली दैनिक सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. श्री. भोसले यांच्या त्या आरोपांचे खंडन आज श्रीमती माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अवैधपणे वाळू वाहतूक करताना पकडलेले वाहन कोणतीच कारवाई न करता सोडल्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली आहे. तथापि, वाहन क्रमांक एम. एच. 11 ए.एल 5328 या वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 47 व 48 नुसार या कार्यालयाकडून कारवाई सुरु आहे. श्री भोसले यांनी या कार्यालयातून फक्त सदर वाहनावर कारवाईचे दरम्यान केलेला पंचनामा, जबाब व अहवाल एवढ्या कागदपत्रांची नक्कल मागणी केली होती व ती त्यांना देण्यात आली होती. 

सदर वाहन मालकाला या कार्यालयाकडून दंडात्मक आदेश बजावण्यात आला असून सदर वसुलीचे अनुषंगाने नियमानुसार नोटीस देण्यात आल्या आहेत व वसुलीची कारवाई सुरू आहे. सदर वाहन महसूल विभागाच्या ताब्यात असून माझ्याकडे तहसीलदार पदाचा पदभार असेपर्यंत कोणतीही विचारणा अथवा कारवाई बाबत त्यांनी माहिती मागितली नाही. सदर वाहनावर कोणती कारवाई करण्यात आली याची कोणतीही माहिती न घेता अपूर्ण कागदपत्रांचे आधारे महिला तहसीलदार व महिला प्रांत अधिकारी यांची हेतुपुरस्सर बदनामी करण्याचा प्रयत्न आमची बदली झाल्यानंतर सुरु आहे.

तसेच छावणीचे देयके छावणी चालक यांना देताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कोणताही विलंब, दिरंगाई या कार्यालयाकडून झालेली नाही. नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने व आमची प्रतिमा मलिन करण्याच्या अनुषंगाने सदर पत्रक बाजी सुरू आहे. सदर हेतुपुरस्पर बदनामी केल्याच्या अनुषंगाने भविष्यात राज्य महिला आयोग व उचित न्यायालयात दाद मागणार असल्याचे श्रीमती माने यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.