Mandhardev Kalubai : मांढरदेव-काळेश्वरी देवीचे मंदिर पाच दिवस राहणार बंद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, काय आहे कारण?

मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा येत्या (Kaleshwari Devi Yatra) २५, २६ व २७ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे.
Kaleshwari Devi Yatra at Mandhardev
Kaleshwari Devi Yatra at Mandhardevesakal
Updated on
Summary

भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याच्या उद्देशानं देवस्थान ट्रस्ट व शासनाच्या वतीनं विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

वाई : मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीच्या मंदिराकडं (Mandhardevi Kalubai Mandir) जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं काॅंक्रिटीकरणाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, भाविकांना यातून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं होणारी गैरसोय टाळण्यासाठी रविवार (ता. ७) ते गुरुवार (ता. ११ जानेवारी) पर्यंत देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टनं (Devasthan Trust) घेतला आहे.

मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा येत्या (Kaleshwari Devi Yatra) २५, २६ व २७ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. या काळात महिनाभर महाराष्ट्र व अन्य राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याच्या उद्देशानं देवस्थान ट्रस्ट व शासनाच्या वतीनं विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

Kaleshwari Devi Yatra at Mandhardev
साताऱ्यातील वाईत आढळली 13 व्या शतकातील 'गद्धेगळ शिळा'; इतिहासात 'गद्धेगळ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील दुकाने मागे सरकवून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या चढणी पायऱ्यांचे काम पूर्ण झाले असून उतरणी पायऱ्यांचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

Kaleshwari Devi Yatra at Mandhardev
Loksabha Election : महायुतीचं ठरलं! समरजीत घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा, मुश्रीफ कोल्हापुरातून लढवणार लोकसभा?

शासनाच्या वतीने भोर सार्वजनिक विभागामार्फत 'भोर - मांढरदेव - वाई' या रस्त्याचे रुंदीकरण काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, गावातील तळ्यापासून मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी देवीचे मंदिर रविवार (ता. ७) ते गुरुवार (ता. ११ जानेवारी) पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.