कोरोनामुक्तीनंतरही 'मराठवाडी'वर सन्नाटा

Marathwadi Dam
Marathwadi Damesakal
Updated on

ढेबेवाडी (सातारा) : मराठवाडी धरणाचे (Marathwadi Dam) बांधकाम थांबले असून, कामगार आपापल्या गावी निघून गेल्याने नेहमी गजबजलेल्या धरणस्थळी सन्नाटा पसरला आहे. काही दिवसांपूर्वीच कामगारांमध्ये कोरोनाचा फैलाव (Coronavirus) झाल्याने धरणाच्या बांधकामावर झालेला परिणाम आता कोरोनामुक्तीनंतरही कायम राहिला आहे. वांग नदीवरील (Wang River) मराठवाडी धरणाचे बांधकाम १९९७ पासून सुरू असले, तरी अद्याप ते पूर्ण झालेले नाही. अलीकडे या धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (Prime Minister Irrigation Agriculture Scheme) समावेश झाल्याने बांधकामाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे. (The Construction Of Marathwadi Dam Has Stopped And The Workers Have Gone To Their Village bam92)

Summary

मराठवाडी धरणाचे बांधकाम थांबले असून, कामगार आपापल्या गावी निघून गेल्याने नेहमी गजबजलेल्या धरणस्थळी सन्नाटा पसरला आहे.

२०१० मध्ये अंशतः घळभरणी झाल्यानंतर धरणात पाणी अडवायला सुरवात झाली. सांडव्यासह तत्सम कामे जसजशी पुढे सरकतील तसतसा धरणात पाणीसाठा वाढत आहे. १२ वर्षांपूर्वी ०.६० टीएमसी पाणीसाठा होत होता. गेल्या वर्षी तो १.४ टीएमसीवर पोचला. या वर्षी १.८५ टीएमसी पाणीसाठा अपेक्षित आहे. जलाशयाच्या काठावरील उमरकांचन-खालचे आवाड आणि मेंढ येथील अनेक घरे यंदाच्या पावसाळ्यात पाण्याखाली जाणार असल्याने धरणग्रस्तांनी घरे मोडून प्रापंचिक साहित्य व संसार निवारा शेडमध्ये हलविले आहेत.

Marathwadi Dam
चिंब भिजलेले, रूप सजलेले! सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याचा विहंगम नजारा

गेल्या वर्षी पावसाळ्यात धरणाची पाणी पातळी ६४६.२० मीटरवर पोचल्यानंतर जलाशयाच्या काठावरील गावात हाहाकार उडाला होता. यावर्षी पाणीपातळी ६५० मीटरवर पोचणार आहे. मराठवाडी धरणाची मूळ क्षमता २.७३ टीएमसी असून, ६५५.८५ मीटर पाणीपातळीचा हा टप्पा पुढच्या पावसाळ्यात गाठण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. काही दिवसांपूर्वीच धरणस्थळावरील ११ कामगारांना कोरोनाची बाधा झाली होती. कोरोना केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार घेऊन सर्व रुग्ण बरे झाले. पाटबंधारे व आरोग्य विभाग, तसेच धरण व्यवस्थापनाने आवश्यक उपाययोजना राबविल्याने धरण परिसर लवकर कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे.

Marathwadi Dam
पाचगणीच्या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करू

कोरोना फैलावाचा परिणाम धरणाच्या बांधकामावर दिसून येत असतानाच आता पावसामुळे अंतर्गत वाहतूक ठप्प झाल्याने धरणाचे बांधकाम थांबविण्यात आले असून, कामगार आपापल्या गावी निघून गेले आहेत. धरणाच्या गेटमधून सध्या १७५ क्यूसेसने विसर्ग सुरू आहे. पावसाला जोर नसल्याने आवक व विसर्ग याचा मेळ बसत असल्याने निम्मा जुलै उलटूनही पाणीसाठा फारसा वाढलेला नाही. मराठवाडी धरणाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोचले आहे. मुख्य गेट, काँक्रिटीकरण, पीचिंग आदी कामांना दिवाळीनंतर वेग अपेक्षित आहे.

The Construction Of Marathwadi Dam Has Stopped And The Workers Have Gone To Their Village bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.