कर्जाच्या नावाखाली रिक्षावाल्‍यांच्या अनुदानावर बॅंकांचा डल्ला!

Rickshaw
Rickshawesakal
Updated on

सातारा : लॉकडाउन काळात (Corona Lockdown) झालेल्‍या नुकसानीतून सावरण्‍यासाठी शासनाने रिक्षाचालकांना (Rickshaw Driver) देऊ केलेले अनुदान बॅंक खात्‍यात (Bank account) जमा झाल्‍यानंतर विविध कारणास्‍तव, तसेच छुप्‍या आकारांच्‍या नावाखाली बॅंकांनी कापून घेतल्‍याचे समोर येत आहे. जमा झालेले अनुदान परस्‍पर कापल्‍याने अनेक रिक्षाचालकांची बँक खाती कोरडीठाकच असून, त्‍यांची अवस्‍था हातावर देऊन कोपरावर मारल्‍यासारखी झाली आहे. (The Money Received By The Rickshaw Driver From The Government Was Deposited In The Bank Account Satara Marathi News)

Summary

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी गतवर्षी शासनाने देशव्‍यापी लॉकडाउन पुकारला होता. तीन महिने अखंडित सुरू झालेला लॉकडाउन नंतर टप्‍प्‍याटप्‍प्‍याने शिथिल करत शासनाने इतर व्‍यवहार पूर्वपदावर आणण्‍याचे धोरण जाहीर केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्‍यासाठी गतवर्षी शासनाने देशव्‍यापी लॉकडाउन पुकारला होता. तीन महिने अखंडित सुरू झालेला लॉकडाउन नंतर टप्‍प्‍याटप्‍प्‍याने शिथिल करत शासनाने इतर व्‍यवहार पूर्वपदावर आणण्‍याचे धोरण जाहीर केले. हे धोरण जाहीर करत असताना शासनाच्‍या आदेशानुसार खासगी प्रवासी वाहतूक सुमारे आठ महिन्‍यांहून अधिक काळ बंदच होती. या काळात सर्वसामान्‍य कष्‍टकरी रिक्षचालक व इतरांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या नुकसानीतून सावरण्‍यासाठी राज्‍य शासनाने रिक्षाचालकांना दीड हजार रुपये अनुदान देण्‍याचा निर्णय घेतला. यानुसार रिक्षाचालकांची नोंदणी करून घेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून संकलित यादी शासनाकडे सादर केली. यानंतर आधारलिंक असणाऱ्या रिक्षाचालकांच्‍या बँक खात्‍यात शासनाचे अनुदान जमा झाले.

Rickshaw
Krishna Election Result Live : मतमाेजणी प्रक्रियेस प्रारंभ

हे अनुदान जमा झाल्‍याचा मेसेज मोबाईलवर आल्‍यानंतर अनेकांनी ते काढण्‍यासाठी बँका, एटीएम सेंटरकडे धाव घेतली. मात्र, तुटपुंज्या जमा रकमेपैकी बहुतांश रक्कम बँकांनी विविध कारणास्‍तव तसेच छुप्‍या आकाराच्‍या नावाखाली कापून घेतल्‍याचे समोर आले. यामुळे अनेकांनी बँकांशी संपर्क साधला असता, त्‍यांना खात्‍यावर कमी रक्कम होती, एटीएम कार्ड वापर तसेच मेसेज शुल्‍क कपात केल्‍याचे, कर्जाच्‍या थकबाकीपोटी जमा रक्कम कापल्‍याचे सांगण्‍यात आले. बॅंकांच्या या धोरणामुळे रिक्षाचालकांच्‍या अडचणीत आणखीनच भर पडली. मध्‍यंतरीच्‍या काळात रिक्षाचालकांना दिलेले अनुदान राष्‍ट्रीयीकृत बॅंकांनी कापून घेऊ नये, असे पत्र राज्‍य शासनाने सर्व बँकांना दिले होते. मात्र, त्‍या पत्राला बॅंकांनी केराची टोपली दाखवत कपात सुरूच ठेवल्‍याचे समोर येत आहे.

Rickshaw
'खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक; कऱ्हाडच्या नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा'

रिक्षाचालकांच्‍या खात्‍यावर जमा झालेले अनुदान अनेक बॅंकांनी परस्‍पर कापून घेतले आहे. यामुळे अडचणीत असणाऱ्या रिक्षाचालकांची अवस्‍था दयनीय होत असून, सध्‍याच्‍या अनलॉकमुळे काही प्रमाणात व्‍यवसाय होत असला तरी त्‍यातून पुरेसे उत्‍पन्न मिळत नाही. त्‍यातच शासनाने दिलेले अनुदान कापण्‍यात आले आहे. अशा प्रकारे किती जणांचे अनुदान जमा झाले आणि ते थेट इतरत्र वळविण्‍यात आले आहे, याची माहिती आम्‍ही घेत आहोत.

-अशोक खैरमोडे, राजधानी रिक्षा संघटना, सातारा

Rickshaw
पाटणात दुरुस्तीच्या नावाखाली पवनचक्क्या भंगारात; कोट्यवधींची उलाढाल!

लॉकडाउन काळात व्‍यवसाय बंद असल्‍याने अनेक रिक्षाचालकांची कर्जे थकली आहेत. त्‍यातच शासनाने दिलेले दीड हजार रुपये बँकांत जमा झाले. आयती संधी चालून आल्‍याने अनेक बॅंकांनी खात्‍यावर जमा झालेले अनुदान कर्जासह इतर छुप्‍या आकाराच्‍या नावाखाली कापून घेतले आहे. या कपातीची माहिती घेऊन आम्‍ही बँकांविरोधात आंदोलन छेडणार आहोत.

-बाबा सय्‍यद, सातारा जिल्‍हा जीप, रिक्षा, टॅक्‍सी युनियन

The Money Received By The Rickshaw Driver From The Government Was Deposited In The Bank Account Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.