कठीण काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद : देशमुख

असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केले.
Satara
SataraSakal
Updated on

दहिवडी : कोरोना काळात, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अतिशय जोखमीचं काम केले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्या कामाची दखल पंचायत समितीने आदर्श पुरस्कार देवून घेतली असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केले.

पंचायत समिती माणच्या एकात्मिक बाल विकास योजना विभाग दहिवडी यांचे विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, प्रभारी सभापती नितीन राजगे, जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार व अरुण गोरे, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, रमेश पाटोळे, तानाजी काटकर, तानाजी कट्टे, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्राबाई आटपाडकर, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, प्रकल्प अधिकारी भरत कोळेकर, विस्तार अधिकारी प्रविण दोरनाल व सदाशिव सपकाळ, हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Satara
भरत जाधवच्या नावाखाली फसवणूक; अभिनेत्याने उघडकीस आणला प्रकार

प्रभाकर देशमुख म्हणाले, जे आपलं नेमून दिलेले काम झोकून देवून करतात त्यांच्या कामाचे कौतुक समाजाकडून केले जातेच. असेच उत्तम काम अंगणवाडी कर्मचारी करत आहेत. समाज घडविण्याच्या प्रक्रियेतील पायाभरणीचे काम अंगणवाडी कर्मचारी करतात. त्यामुळेच आदर्श पुरस्कार देवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सोनाली पोळ म्हणाल्या, कोरोना काळात ज्यावेळी सर्वजण घरात बसले होते त्यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले.

Satara
ग्लॅम-फूड : ‘आलू फ्राय’ अतिशय प्रिय

त्यामुळे त्यांच्यासाठी पुरस्कार ही खुप गोड गोष्ट आहे. त्यांच्या पाठीवर दिलेली ही कौतुकाची थाप त्यांना काम करण्यास प्रेरणा देईल. याच अंगणवाडी कर्मचाऱ्यांमुळेच पोषण अभियानात सातारा जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. अरुण गोरे म्हणाले, अतिशय कठीण परिस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. या पुरस्कारांसोबतच त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देणे आवश्यक यावेळी २१ अंगणवाडी सेविका व १४ अंगणवाडी मदतनीस यांना आदर्श पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. प्रकल्प संचालक भरत कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. वीरधवल शिंदे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रवीण दोरनाल यांनी आभार मानले.

प्रथमच झालेल्या अतिशय नेटक्या कार्यक्रमाचे कौतुक

प्रभारी सभापती नितीन राजगे यांच्या पुढाकाराने प्रथमच अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा आदर्श पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामुळे सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यात उत्साहाचे अन आनंदाचे वातावरण होते. त्यातही कार्यक्रमाचे नेटके आयोजन, सर्वांची शिस्त यामुळे पाहुणे व उपस्थितांनी आयोजकांचे खास कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()