अण्‍णासाहेब पाटील महामंडळाच्या 61 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; नरेंद्र पाटील संतप्त, मुख्‍यमंत्र्यांना विचारणार जाब

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर गंभीर असतात.
Narendra Patil vs Eknath Shinde
Narendra Patil vs Eknath Shindeesakal
Updated on
Summary

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे (Annasaheb Patil Mahamandal) कर्मचारी व्यवस्थापकीय संचालक यांनी काल आदेश काढून अचानक ६१ कर्मचारी कमी केले आहेत.

कऱ्हाड : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर गंभीर असतात. मात्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी ६१ कर्मचारी तडकाफडकी काढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एका बाजूने मराठा समाजाच्या बाजूने असल्‍याचे दर्शवतात आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी कमी करतात. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून जाब विचारणार आहे, असे मत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी व्यक्त केले.

Narendra Patil vs Eknath Shinde
Kolhapur Flood : 'आलमट्टीबरोबरच हिप्परगेही कोल्हापूर, सांगली महापुरासाठी कारणीभूत'; पूर परिषदेत 'हे' दहा ठराव मंजूर

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे (Annasaheb Patil Mahamandal) कर्मचारी व्यवस्थापकीय संचालक यांनी काल आदेश काढून अचानक ६१ कर्मचारी कमी केले आहेत. त्यावरून अध्यक्ष पाटील संतप्त झाले आहेत. ते म्हणाले, ‘‘राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने बघतात. मात्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी ६१ कर्मचारी तडकाफडकी काढले आहेत.

महामंडळाचे कामकाज हे ऑनलाइन चालते. असे असूनही व्यवस्थापकीय संचालकांनी कोणाच्या सांगण्यावरून ते कर्मचारी कमी केले? राज्याचे मुख्यमंत्री एका बाजूने मराठा समाजाच्या बाजूने असल्‍याचे दर्शवतात आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी कमी करतात. कर्मचारी कमी केल्यामुळे मराठा समाजाच्या लाभार्थींना त्यांना वेळेवर व्याज परतावा मिळणार नाही, कामे वेळेत होणार नाहीत. महामंडळाच्या लाभार्थ्यांना बॅंकेने कर्ज दिले नाही आणि महामंडळाचे कर्मचारी कार्यरत नसतील तर ते कर्जदार कोणाला भेटणार? त्यामुळे व्यवस्थापकीय संचालक यांनी केलेले कृत्य हे महामंडळाच्या विरोधात आणि प्रत्यक्षात मराठा समाजाच्या विरोधात आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून जाब विचारणार आहे.’’

Narendra Patil vs Eknath Shinde
खोटी कागदपत्रं देऊन 'बँक ऑफ इंडिया'ची 61 कोटी 15 लाखांची फसवणूक; भाजपच्या 'या' बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

असाही आरोप

मुख्यमंत्री, मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक घेऊन महामंडळाचे कर्मचारी कमी केले. त्यामुळे महामंडळाच्या कामकाजाची ओरड होणार आहे. व्याज परतावा वेळेवर होणार नाही, बॅंकेतून कर्ज मिळणार नाहीत. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे कोणाच्या बोलवण्यावरून महामंडळ अडचणीत आणण्याचे काम करत असल्‍याचा आरोपही यावेळी करण्‍यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.