कऱ्हाड - जंगली हिंस्र प्राण्याच्या नख्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. तर त्याचा साथीदार पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. शहरातील शनिवार पेठेत सागर लॉजनजीक असलेल्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवर रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने आरोपीकडून ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.