Koyna : मुख्यमंत्री शिंदेंच्या गावालगत मोठी दुर्घटना; पूल कोसळून तीन जण गंभीर जखमी, अपघाताला जबाबदार कोण?

मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील कोयनेच्या भूमिपुत्रांची अद्यापही परवड चालू आहे.
Koyna Accident
Koyna Accidentesakal
Updated on
Summary

गेली कित्येक वर्ष जनता या पुलासाठी आक्रोश करीत आहे. पण, याचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानी पडत नाही.

भिलार : मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील कोयनेच्या भूमिपुत्रांची अद्यापही परवड चालू असून दोन दिवसांपूर्वी शिंदी ते आरवला जोडणारा पूल कोसळून झालेल्या अपघातात तीन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले असल्याने या विभागात खळबळ उडालीये.

कोयना धरण (Koyna Dam) ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असून या जलाशयाशेजारील सातारा जिल्ह्यातील शिंदी, वलवण, आरव, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, अकल्पे, गाढवली आदी गावे आपत्तीच्या वेळी नेहमीच संपर्कही न होतात. याकडं मात्र जिल्हा प्रशासन गांभीर्यानं पाहत नाही.

या गावांना बाजारहाट करण्यासाठी खेडला जावे लागते, त्याला जोडणारा रघुवीर घाट ही असुरक्षित आहे. कोयना या दुर्गम विभागातील शिंदी ते मोरणी हा १४ किलोमीटरचा रस्ता गेली ३५ वर्षापासून वनविभागाच्या आडमुठे धोरनामुळे दुर्दैवाचे फेऱ्यात अडकला आहे.

Koyna Accident
Devendra Fadnavis : कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यात भाजपचाच खासदार हवा; NCP च्या बालेकिल्ल्यातून फडणवीसांचा आदेश

या समस्यांसाठी शिंदी येथील नवतरुण मित्र मंडळ नेहमी सक्रिय आहे. परंतु, त्यांना कसलेही यश येताना दिसत नाही. शिंदी ते मोरणीला जोडणारा नदीवरील लोखंडी पूल गेली दहा वर्षापूर्वी पडला असून याची दुरुस्ती न झाल्याने ही गावे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. प्रशासनाने या गावातील लोकांसाठी बोट दिली होती.

Koyna Accident
माता न तू वैरणी! अनैतिक संबंधाची माहिती समजताच आईनं पोटच्या पोराचा केला खून; हैवानी कृत्यानं खळबळ

परंतु, गेली कित्येक वर्ष जनता या पुलासाठी आक्रोश करीत आहे. पण, याचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानी पडत नाही. काल ग्रामस्थांनी चक्क स्वतः स्वखर्चाने हा पूल बांधण्याचा निर्णय घेतला. सर्वजण एकवटले आणि कामाला सुरुवात झाली. पण, अचानक हा पूल पडला आणि ग्रामस्थ या पुलाखाली सापडले.

या अपघातात रामचंद्र नाना शिंदे, आणाजी बर्गे आणि विनोद जयसिंग मोरे हे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना लागलीच उपचारासाठी खेड येथे नेले. परंतु, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला कळवा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Koyna Accident
PM मोदींना देशाची तर सोनिया गांधी, शरद पवारांना स्वतःच्या मुलाबाळांची चिंता; बावनकुळेंचा विरोधकांवर निशाणा

आम्ही आमच्या जमिनी कोयनेसाठी दिल्या असताना आम्हाला मात्र आता अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. शासन आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या सुविधा आम्हालाच कराव्या लागत आहेत. मग अशा अपघातांना जबाबदार कोण? या अपघातातील जखमींना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ भूषण मोरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.