श्रेयवादाच्या लढाईत आमदार महेश शिंदेंची बाजी

Mahesh Shinde
Mahesh Shindeesakal
Updated on
Summary

26 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विसापूर (सातारा) : खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्त्‍वपूर्ण असणाऱ्या जिहे-कटापूर योजनेचे पाणी (Jihe-Katapur scheme) सोमवारी सायंकाळी नेर तलावात पोचले. या पाण्याचे पूजन आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांच्या हस्ते आज सकाळी सात वाजता पार पडले. त्यावेळी त्यांचे समर्थक आणि खटाव व कोरेगाव तालुक्यांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

सन १९९५ मध्ये मंजूर झालेल्या जिहे-कटापूर योजनेचा फायदा हा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे डोळे लावून बसले होते. अखेर २६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mahesh Shinde
नवऱ्याचा बायकोवर राग, दहा घरांना लावली आग; ग्रामस्थांकडून पतीला चोप
Mahesh Shinde
Mahesh Shinde

दरम्यान, पुसेगाव येथे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, पंचायत समितीच्या सदस्या नीलादेवी जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती वैशालीताई फडतरे यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. तसेच या पाण्याचे कलश भागातील प्रत्येक गावात दिले गेले असून, त्याचा ग्रामदैवतास अभिषेक करण्यात येणार आहे.

Mahesh Shinde
बांगलादेशात 9 वर्षात हिंदूंची 3700 हून अधिक घरं, मंदिरांची तोडफोड

श्रेयवादाच्या लढाईत बाजी

खटाव तालुक्यातील बहुचर्चित जिहे-कटापूर जलसिंचन योजनेवरून आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच महेश शिंदे यांनी या योजनेचा उद्घाटन समारंभ घेऊन एकप्रकारे श्रेयवादाच्या लढाईत बाजी मारल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.