महाबळेश्वर, पाचगणीत काही पॉइंट होणार खुले

प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांची माहिती; नियमांचे पालन करण्याची सक्ती
mahabaleshwar
mahabaleshwarsakal
Updated on

महाबळेश्वर : वेण्णालेक, ऑर्थरसीट व टेबललँड वगळता महाबळेश्वर(MAHABALESHWAR) व पाचगणी येथील उरलेले सर्व पॉइंट काही अटी आणि शर्तींवर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह(collector shekhar sinh) यांनी घेतल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी येथे आयोजिलेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे महाबळेश्वर व पाचगणी येथे पर्यटकांची गर्दी होणारे पॉइंट अर्थात प्रेक्षणीय स्थळे बंद करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांनी महाबळेश्वर व पाचगणीकडे पाठ फिरविल्याने येथील व्यवसाय ठप्प होऊ लागला. त्यानंतर नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार मकरंद पाटील यांच्याकडे पॉइंट सुरू करण्याची मागणी केली.

mahabaleshwar
‘डबल इंजिन’मुळे वेगाने विकास; पंतप्रधान मोदींचा दावा

आमदार पाटील व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याबरोबर चर्चा केली; परंतु कोरोनाचे नियम हे राज्य शासनाचे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल करण्यास असमर्थता व्यक्त केली म्हणून आमदार पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात अतिरिक्त सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन पर्यटनस्थळांवरील लोकांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आणले. गुप्ता यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांवरील गर्दीचा आढावा घेण्याची सूचना केली.

त्याप्रमाणे गेली दोन दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर येथे भेट देऊन गर्दीचा आढावा घेतला. या संदर्भात त्यांनी महसूल, पालिका, वन व पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर आपला अहवाल त्यांनी सचिव असीम गुप्ता यांना पाठविला. त्यानुसारत्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही अटी आणि शर्तींवर पॉइंट सुरू करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची माहिती देण्यासाठी आज दुपारी प्रांताधिकारी जाधव यांनी हिरडा विश्रामगृहावर विविध संघटनांच्या प्रतिनिधींची व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत मोठी गर्दी होणारे पॉइंट वगळता उरलेले सर्व पॉइंट सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार प्रत्येक पॉइंटवर पर्यटकांची २५ वाहने जातील. त्यापेक्षा अधिक आलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या सर्व ठिकाणीकोरोनाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच येथील स्थानिक नागरिक व व्यावसायिकांवर आहे, असेही प्रांताधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.

mahabaleshwar
अतिवृष्टीग्रस्तांकडे गांभीर्याने लक्ष द्या; वेण्णा पूरग्रस्त समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

या बैठकीला पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार, अब्दुल बिद्री, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष असिफ सय्यद, दिलीप जव्हेरी, टॅक्सी संघटनेचे अंकुश बावळेकर, सी. डी. बावळेकर, घोडा संघटनेचे जावेद खारकंडे, सूर्यकांत जाधव आदी उपस्थित होते.

mahabaleshwar
बाप हा बापच असतो... बिबटयापासून वाचवले पोटच्या गोळ्याला

सर्व ठिकाणी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच येथील स्थानिक नागरिक व व्यावसायिकांवर आहे.

- राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.