नववर्षाच्या स्‍वागतासाठी उत्‍साही पर्यटक महाबळेश्वर, पाचगणीत दाखल; प्रसिद्ध वेण्णा लेकला जत्रेचं स्वरूप

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी (Tourists) बहरले आहे.
Mahabaleshwar Tourism
Mahabaleshwar Tourismesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून, सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात येथे दाखल होत आहेत.

महाबळेश्वर : नववर्षाच्या (New Year) स्वागतासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गिरिस्थान महाबळेश्वर (Mahabaleshwar) व पाचगणी पर्यटकांनी बहरले आहे. याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी (Tourists) बहरले आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचे स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे. नौका विहाराबरोबर खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत धमाल मस्ती केली जात आहे.

Mahabaleshwar Tourism
Ratnagiri Fish Market : कोकणात सुक्या मासळीला पर्यटकांची वाढती पसंती; दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल

ऐन थंडीतही पर्यटक आइस्क्रीम, स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईस गोळ्यांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत. महाबळेश्वरसह आता पर्यटक तापोळा व पाचगणी येथे देखील गर्दी करत आहेत. येथील बाजारपेठात मिळणाऱ्या प्रसिद्ध वस्तू आणि पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. येथील प्रसिद्ध चणे, जाम, जेली, चिक्की, चटकदार स्ट्रॉबेरी खरेदीसाठीही गर्दी होताना दिसत आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून, सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

Mahabaleshwar Tourism
Olive Ridley Turtle : मुरूडनंतर दापोली समुद्रकिनारी आढळले ऑलिव्ह रिडले कासवांचे 80 अंड्यांचे घरटे

नियम पाळणे गरजेचे

  • महाबळेश्वर वन विभागाच्या हद्दीत वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये.

  • त्रास देणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होणार

  • खासगी बंगले, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये रात्री पार्टी करण्यावर बंदी

  • धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना फटाके फोडण्यास बंदी

  • धूम्रपान, मादक पदार्थाचे सेवन करण्यास बंदी

  • मद्य पिऊन गाडी चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.