सातारा जिल्ह्यातील आडते, व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याचे पाडले दर

भाजीपाल्याचे भाव
भाजीपाल्याचे भाव
Updated on
Summary

बळीराजा शेतकरी संघटना जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सभापतींच्या दालनाला टाळे ठोकेल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिली आहे.

कऱ्हाड (सातारा): जिल्ह्यातील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आडते आणि छोटे रिटेल व्यापाऱ्यांनी भाजीपाल्यांचे दर संगनमताने पाडले आहेत. तरीही बाजार समित्यांच्याचे सभापती, उपसभापती, संचालक मुग गिळून गप्प आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे सभापती, उपसभापती, आडते यांची मिटींग घेऊन योग्य त्या सूचना द्याव्या. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सभापतींच्या दालनाला टाळे ठोकेल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिली आहे.

भाजीपाल्याचे भाव
'नारायण राणे मुर्दाबाद..'; कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक

यावेळी श्री. मुल्ला म्हणाले, कोरोना विरूध्द दोन लढा सुरु आहे. कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे झाले आहे. भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली. आगोदर निसर्गनिर्मित संकट आता मानवनिर्मित संकटामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये आडते आणि छोटे रिटेल व्यापारी यांनी भाजी पाल्यांचे दर संगनमताने पाडले आहेत. पाच ते दहा रुपयांनी टोमॅटो, ढबू आदी शेती उत्पादीत मालांचे दर पाडले आहेत.

भाजीपाल्याचे भाव
कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक;पाहा व्हिडिओ

अगदी दहा रुपये ते वीस रुपये कॅरेटला दर देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम आडते करत आहेत. सर्वसामान्य लोकांना भाजीपाला स्वस्त मिळत नाही. यातून आडते आणि व्यापारी लाखो रुपये कमवत आहेत. एकीकडे भाजी पाल्यांचे दर पाडायचे आणि तोच भाजीपाला परराज्यात पर जिल्ह्यात चढ्या भावाने विकायचा अशी आडत्यांची टोळी कार्यरत आहे. याबाबत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मिरविणारे बाजार समित्यांचे सभापती उपसभापती संचालक मुग गिळून गप्प आहेत. त्याबाबत तात्काळ जिल्हा उपनिबंधकांनी बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा बाजार समित्यांच्या सभापती यांच्या दालनाला टाळे ठोकणार असल्याचाही इशारा श्री. मुल्ला यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.