Khambatki Ghat : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहतूक विस्कळीत; रस्त्यावर वाहनांच्या रांगा, काय आहे कारण?

महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी (Khandala Police) घटनास्थळी भेट देऊन सिंगल लेन वाहतूक सुरू केली. Pune-Satara highway
Khambatki Ghat on Pune-Satara Highway
Khambatki Ghat on Pune-Satara Highwayesakal
Updated on
Summary

या घाटात सकाळपासून सिंगल लेन वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. विकेंड असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याने अनेक वाहनांची घसरगुंडी झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, यात गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी, की आज पहाटे घाटातील भैरवनाथ मंदिराजवळ (Bhairavnath Temple) असणाऱ्या वळणावर एका गाडीचे ऑइल किमान 100 मीटर अंतरावर पसरले. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तर, काही गाड्या घसरून कठड्यास धडकल्या. यात गाडींचे किरकोळ नुकसान झाले.

Khambatki Ghat on Pune-Satara Highway
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! कास पठारावर पावसाळी पर्यटन झाले सुरू; एका व्यक्तीला किती रुपये द्यावे लागणार शुल्क?

मात्र, कसलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी (Khandala Police) घटनास्थळी भेट देऊन सिंगल लेन वाहतूक सुरू केली. या घाटात सकाळपासून सिंगल लेन वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. विकेंड असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी खंडाळा शहरातील टँकर व अग्निशामक यंत्रणा यांना बोलून रस्त्यावर पाणी मारण्यात आले. मात्र, तरीही रस्ता निसरडाच राहिला आहे. यानंतर दुपारी या महामार्गावर माती टाकून रस्ता साफ करण्याचे काम सुरू होते. यासाठी महामार्ग पोलिसांनी मोठी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.