पावसापूर्वी कास धरणावरील पूल होणार?; बामणोली, तांबी, जुंगटीचा 'प्रश्न' सुटणार!

गेल्या दोन वर्षांपासून कास धरणाचे उंची वाढवण्याचे काम चालू आहे.
Kas Dam
Kas Damesakal
Updated on

कास (सातारा) : गेल्या दोन वर्षांपासून कास धरणाचे (Kas Dam) उंची वाढवण्याचे काम (Bridge Work) चालू आहे. धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना या धरणाच्या भिंतीवरून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी पुलाचे काम चालू आहे. सद्य:स्थितीत हा पूल प्राथमिक अवस्थेत असून हा पूल पावसापूर्वी (Rain) होण्याची शक्‍यता फारच कमी असल्याने बामणोली भागातील सर्व गावे आणि कास धरणाच्या पलीकडील तांबी, जुंगटी परिसरातील गावांचा वाहतुकीची कोंडी होणार आहे. (Traffic Jam Due To Bridge Work On Kas Dam Satara News)

कास धरणाची उंची वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना सध्या धरणातील पाणी बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या सांडव्याचे काम चालू आहे. या सांडव्यावरूनच कास गावालगतच पुलाचे काम चालू आहे. सद्य:स्थितीत पुलाचे काम पायातच असून या परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होते. जेमतेम 15 दिवस ते तीन आठवड्यांच्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण होणे अशक्‍य आहे. सध्याचे काम चालू असलेल्या परिसरातून कच्चा रस्ता वाहतुकीसाठी सुरू असून थोडासा पाऊस झाला तरी मातीमुळे चिखलात गाड्या चालवणे अवघड बनणार असून अपघातांचा धोका वाढला आहे. कास धरणाचे काम ही कूर्मगतीने चालू आहे.

तलाव भरल्यानंतर पाणी वाहून जाणारा जुना ओढा नवीन धरणाच्या भिंतीत गेला आहे. त्यामुळे पहिला पाण्याचा प्रवाह असणाऱ्या जागेवर भराव टाकून रस्ता ओढ्याच्या पलीकडे काढला आहे. त्या ठिकाणीही पाणी जाण्यासाठी भरावाखाली मोऱ्या नसल्याने पाणी पलीकडे कसे जाणार, हा प्रश्नच आहे. सध्या कच्चा असणारा मातीचा रस्ता पक्का करण्याचे नियोजन असल्याचे ठेकेदाराकडून सांगितले जात असले तरी पावसापूर्वी ही सर्व काम न झाल्यास बामणोलीसह कास परिसरातील गावांचा वाहतुकीचा प्रश्न अडचणीचा ठरणार आहे.

Kas Dam
साता-यात संततधार सुरुच; तापाेळ्यासह महाबळेश्वरात सर्वाधिक पाऊस

कास धरणावरील रस्ता पक्का न झाल्यास रस्त्यावरील चिखलात भात लागण करण्याची वेळ येणार असून वेळ हातात असतानाच येथील कामे सुरळीत करावीत.

-राजेंद्र संकपाळ, माजी सरपंच, बामणोली

Traffic Jam Due To Bridge Work On Kas Dam Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.