सातारा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहरात वाहतूक विभागाने १२ ते २० मे दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८९५ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून पाच लाख २ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. वाहनचालकांनी सर्व कागदपत्रे जवळ बाळगण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत बहुतांश वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महाविद्यालयीन परिसर व इतर ठिकाणी तरुण वाहने सुसाट वेगाने चालवत वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना चाप बसविण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात पोवई नाका, समर्थ मंदिर, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरंट, गोडोली नाका, विसावा नाका, वाढे फाटा, आरटीओ ऑफिस आदी परिसरासह विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यात नंबर प्लेटविना १४८ वाहन चालविणाऱ्यांकडून ८३ हजार रुपये, गडद काळ्या काचा लावल्याप्रकरणी ८८ केसेस करून त्यांच्याकडून ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
याचबरोबर वाहन चालवण्याचा परवाना निलंबनाची ५७ कारवाई, मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी १५ कारवाई, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी १७ केसेस, नाकाबंदीवेळी ताब्यात घेतलेली १६६ वाहने अशा प्रकारे ८९५ वाहनधारकांविरोधात वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
वाहतूक विभागाच्या वतीने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसेच यापुढे देखील कारवाई सुरू राहणार असून, वाहनचालकांनी कागदपत्रे जवळ बाळगून नियमांचे पालन करावे.
- विठ्ठल शेलार, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.