मेढा येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" कार्यक्रमाची तालीम

रॅली दरम्यान विधी सेवा प्राधिकरण माहिती पत्रके वाटली तसेच कायदेविषयक जनजागृती करण्यात आली
मेढा येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"  कार्यक्रमाची तालीम
मेढा येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" कार्यक्रमाची तालीम
Updated on

केळघर : महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांचे निर्देशानुसार जावळी तालुका विधी सेवा समिती, जावली बार असोसिएशन मेढा, विधी स्वयंसेवक व न्यायालयीन कर्मचारी यांचे वतीने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" कार्यक्रमाची तालीम मेढा येथे नुकतीच संपन्न झाली.

प्रारंभी दुचाकी आणि चारचाकी वाहनातून विधी सेवा प्राधिकरणाची माहिती फलक घेवून मेढा चौक-तहसिल कार्यालय, भैरवनाथ मंदिर, कुंभारवाडा, वेण्णा चौक, बजारचौक अशी रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान विधी सेवा प्राधिकरण माहिती पत्रके वाटली तसेच कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. तसेच सदरची कायदेविषयक शिबीर जवळवाडी, बिभवी, करंजे, चोरांबे येथे आयोजीत करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ,पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

मेढा येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"  कार्यक्रमाची तालीम
"दिल्लीत बसलेले जम्मू-काश्मीरचा प्रयोगशाळेसारखा वापर करतायत"

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम दि.२ ऑक्टोंबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ अखेर आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात भित्ती पत्रके व माहिती पत्रके वाटणे, मध्यस्थी व विधी साक्षरता मेळावे आयोजीत केले आहेत. या कार्यक्रमास नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जावली तालुका विधी सेवा समिती मेढा व बार असोसिएशन, मेढा यांचे वतीने करण्यात आले आहे. तसेच २५सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली करावीत, असे आवाहन न्यायाधीश निलेश काळे यांनी यावेळी केले.

मेढा येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"  कार्यक्रमाची तालीम
IPLच्या प्रसारणाला अफगाणिस्तानात बंदी; तालिबान सरकारचा निर्णय

सदर रॅली यशस्वी करणेकामी मेढा बार असोसिएशनचे पदाधिकारी अँड. आर.एस. पोफळे, मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, ऍड विशाल महाडिक, ज्येष्ठ विधीज्ञ एच.व्ही. वीर, पुनम गोरे, वृषाली गाढवे, आरती शेटे पंचायत समिती जावळी, ग्रामसेवक तसेच करंजे, जवळवाडी, बिभवी, व चोरांबे ग्रामपंचायत पदाधिकारी , ग्रामस्थ यांनीही सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.