सातारा : दोघांना वाचवण्याऐवजी लोकांचा सफरचंदांवर डल्‍ला

सातारा : दोघांना वाचवण्याऐवजी लोकांचा सफरचंदांवर डल्‍ला
Updated on

उंब्रज (जि. सातारा) -  कऱ्हाडकडे जाणाऱ्या लेनवरील तारळी पुलानजीक काश्‍मीरहून सफरचंद घेऊन निघालेल्या मालट्रक येथे गुरुवारी पलटी झाला. ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर महामार्गावर सफरचंदाचे विखुरलेले बॉक्‍स अनेकांनी बॉक्‍स पळवल्याची चर्चा नागरिकांत होती. 

पोलिसांनी सांगितले, की पुणे बंगळूर महामार्गावरील तारळी नदीच्या पुलावरील वळणावर ट्रक पलटी झाला. तो ट्रक काश्‍मीरहून सफरचंद घेऊन बंगळूरला निघाला होता. महामार्गावरील दुभाजकाला धडकून पलटी झाला. ट्रकमध्ये सुमारे एक हजार सफरचंदाच्या पेट्या होत्या.

राजे.. पोटापाण्यासाठी आलेल्यांची परवड थांबवा

अपघातानंतर पेट्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. त्याचाच फायदा घेऊन नागरिकांनी सफरचंदाच्या पेट्या उचलून नेल्या आहेत. परंतु काेणीही ट्रकमधील लाेकांना बाहेर काढण्यास पुढे आले नाही. हे पाहून काहींनी ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचे म्हटले.

सफरचंद घेऊन पळणाऱ्या नागरिकांना पाेलिसांनी हटकले व अडकलेल्या चालक-वाहकांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून महामार्ग पूर्ववत केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.