परदेशातून आलेल्या सातारकरांचा आराेग्य विभागास दिलासा

परदेशातून आलेल्या सातारकरांचा आराेग्य विभागास दिलासा
Updated on

सातारा : ब्रिटनहून परतलेल्या सातारकर नागरिकांचे कोविड 19 चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेस दिलासा मिळाला आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 31 प्रवाशांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 27 प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनूसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वक्षण करण्यात येत आहे. परदेशातून सातारा जिल्ह्यात 42 प्रवाशांची यादी राज्य शासनाने सातारा जिल्हा प्रशासनास पाठविले होती. त्यानूसार आरोग्य विभागाने संबंधित प्रवाशांशी संपर्क साधला. या प्रवाशांपैकी चार प्रवाशांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. उर्वरित प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काहींचा अलगीकरणाचा कालावधी संपला आहे.

कऱ्हाडकरांनाे थांबा! अनोळखी व्यक्तीच्या हातात एटीएम कार्ड देऊ नका 

दरम्यान जिल्ह्यातील 31 पैकी 27 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सातारा जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांनी जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी केले आहे.

दिव्यांग, आजारी शिक्षकांना इलेक्‍शन ड्यूटी नको; प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

शेतीतील नवनव्या प्रयोगातून शेणोलीत विद्यार्थ्याची लाखाेंची कमाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.