नेर तलावात २२ टक्के पाणीसाठा

लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतेत; जिहे- कटापूरचे आवर्तन सुरू करण्याच्या मागणीला जोर
twenty two percent water storage in ner lake
twenty two percent water storage in ner lake
Updated on

विसापूर - जुलै महिना संपत आला, तरी खटाव तालुक्यात समाधानकारक पाऊस नाही. तालुक्याला वरदान ठरलेल्या नेर तलावात फक्त २२ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. तलाव भरल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जिहे-कटापूरचे आवर्तन सुरू करून नेर तलाव भरावा, अशी लाभक्षेत्रातील शेतकरी मागणी करत आहेत.

जिल्ह्यात पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, खटाव तालुक्यात अजूनही दुष्काळी चित्र आहे. यंदा उन्हाळी पाऊस देखील तुलनेने अत्यल्प झाला. मॉन्सूनने पाठ फिरवल्याने रिमझिम पावसाच्या ओलीवर खरीप पिकांच्या पेरण्या करून शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत. शेतात उगवून आलेल्या पिकांवर ऊन, ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. पाण्याअभावी खरिपासोबत रब्बीचाही हंगाम अडचणीत सापडण्याची भीती आहे.

सद्यःस्थितीत तलावात जिहे-कटापूर योजनेचे पाणी सोडले, तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यातून सिंचन व पाणीटंचाईची समस्या दूर होईल. अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असताना नेर तलावात जिहे- कटापूरचे पाणी सोडण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. नेर तलावावरती परिसरातील नऊ गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास रब्बी हंगामातील २६३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. नदीकडेला असणाऱ्या विहिरींना सिंचन, पाणीपुरवठ्याच्या योजनांना लाभ होतो. त्यामुळे जिहे-कटापूर योजनेच्या पाण्याद्वारे नेर तलाव भरण्याची आवश्यकता आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

बहुचर्चित जिहे-कटापूर जलसिंचन योजनेच्या श्रेयवादाच्या लढाईचा राजकीय कलगीतुरा तालुक्यातील जनतेने अनुभवला आहे. सद्यःस्थितीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर येथील लोकप्रतिनिधींनी नेर तलावात जिहे-कटापूरचे आवर्तन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.