नियतीनं एकाचवेळी दोघांना घेतलं हिरावून; कार अपघातात सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू

Accident at Gondawale Khurd
Accident at Gondawale Khurdesakal
Updated on
Summary

ग्रामयात्रेच्या पूर्वसंध्येलाच एकाच कुटुंबातील दोन तरुणांच्या मृत्यूने पानवण गावावर शोककळा पसरलीय.

गोंदवले (सातारा) : गोंदवले खुर्द जवळ सकाळी झालेल्या कार आणि दोन दुचाकींचा अपघातात (Accident) सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. उमाजी नरळे जागेवरच ठार झाला असतानाच त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी अजित नरळेने 'मला वाचवा' असा फोडलेला अर्जवाचा टाहो मात्र त्याच्या निधनानं मन हेलावणारा ठरला. ग्रामयात्रेच्या पूर्वसंध्येलाच एकाच कुटुंबातील दोन तरुणांच्या मृत्यूने पानवण (ता. माण) गावावर शोककळा पसरलीय.

ऊस तोडणी व मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील अजित हा एकुलता एक असून पुण्यात नोकरी करत होता, तर उमाजी हा नेपाळला (Nepal) सोन्या-चांदीच्या दुकानात कामाला होता. येत्या शुक्रवारी व शनिवारी पानवण (ता. माण) येथील मरीआई देवीची वार्षिक यात्रा होणार आहे. त्यानिमित्ताने उमाजी आप्पाजी नरळे (वय २२) दीड वर्षानंतर गावी परतत होता. दुचाकीवर (पल्सर, नंबर माहीत नाही) त्याच्यासोबत चुलत भाऊ अजित शंकर नरळे (वय १८) होता. अनेक दिवसांनी भेटलेले दोघे भाऊ यात्रेसह एकत्रित एन्जॉय करण्याची स्वप्न सोबत घेऊन गावी निघाले होते. याचवेळी नामदेव नागू वीरकर (वय ४५, रा. जांभुळणी, ता. माण) हेही दुचाकीवरून (एम एच ११ सीके ८०४३) म्हसवडकडे निघाले होते.

Accident at Gondawale Khurd
ताजमहालच्या 'त्या' 22 खोल्यांमध्ये काय? ASI ने प्रसिद्ध केले फोटो

यादरम्यान गोंदवले खुर्द हद्दीतील हॉटेल मेजर जवळ समोरून आलेल्या स्विप्टची (एम एच १४ जीएच ४४५८) व या दोन्ही दुचाकींची जोरदार धडक होऊन मोठा अनर्थ घडला. या अपघातात पल्सर आणि स्विप्टसह अजित नरळे व नामदेव वीरकर रस्त्यालगतच्या सुमारे तीस फूट खोल खड्ड्यात उडून पडले. कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर अपघातानंतर अचानक पेटलेली पल्सर जाळून खाक झाली.

Accident at Gondawale Khurd
आझम खान यांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टानं जामिनावरचा निर्णय ठेवला राखून

या भयानक तिहेरी अपघातात मात्र घरी पोचण्यापूर्वीच उमाजीचा जागेवरच मृत्यू झाला. तर अजित व नामदेव गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने गोंदवल्याच्या ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यावेळी 'काका मला वाचवा'अशा आर्जवाने अजितने टाहो फोडला. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने नेत असताना वाटेतच अजित नरळेही मृत झाला. सख्ख्या चुलत भावांच्या अपघातात झालेल्या मृत्यूने पानवण गावावर शोककळा पसरली. अपघाताची माहिती समजताच दहिवडी पोलीस ठाण्याचे (Dahiwadi Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

Accident at Gondawale Khurd
बृजभूषणांनंतर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर काय म्हणाले गोविंददेव महाराज?

नियतीनं एकाचवेळी दोघांनाही हिरावून घेतलं

ऊस तोडणीसह मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या नरळे कुटुंबीयातील उमाजी व अजित या सख्ख्या चुलत भावंडांचे कुटुंबाला आधार देण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु, नियतीने एकाचवेळी दोघांनाही हिरावून घेतल्याने नरळे कुटुंबीयांवर मोठा आघात झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.