Car Accident : दुचाकीवरून औषध आणण्यासाठी जाणाऱ्या सख्ख्या बहि‍णींवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोघी ठार, भाऊही जखमी

तेजस तानाजी कोठावळे (वय २१) हा जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Car Accident Pune
Car Accident Puneesakal
Updated on
Summary

धावडशी येथे अमृता व अर्चना यांचे मृतदेह गुरुवारी आणल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. गावातील स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

सातारा : दुचाकीवरून औषध (Medicine) आणण्यासाठी भावासह ट्रिपलसीट जात असताना चारचाकी मोटारीने धडक दिल्याने धावडशी (ता. सातारा) येथील जखमी झालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला, तर भावावर उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी पुण्यातील (Pune) नगररोडवर आळे फाट्यावर झाला. अमृता तानाजी कोठावळे (वय २६), अर्चना तानाजी कोठावळे (वय २८, रा. धावडशी, ता. सातारा) अशी मृतांची नावे आहेत.

तेजस तानाजी कोठावळे (वय २१) हा जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी, की धावडशीतील तानाजी कोठावळे हे कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. दोन्ही मुलीही चांगल्या शिकून कंपनीत जॉब करत होत्या. शनिवारी औषध आणण्यासाठी अमृता, अर्चना या दोघी बहिणी भाऊ तेजस याच्यासोबत दुचाकीवरून चालल्या होत्या. पुण्यातील नगररोडवर आळे फाट्यावर त्यांच्या दुचाकीला चारचाकीने धडक दिली.

Car Accident Pune
दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरवरच काळाचा घाला; 108 रुग्णवाहिकेची ट्रकला मागून जोरदार धडक

यात तिघेही दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. यामध्ये अमृता व अर्चना गंभीर जखमी झाल्या होत्या, तर तेजस किरकोळ जखमी झाला. त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये (Private Hospital) दाखल करण्यात आले होते. पाच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी अमृता व अर्चना यांचा मृत्यू झाला.

Car Accident Pune
मिरचीपूड टाकून इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला; आमदार भरणेंकडून कठोर कारवाईचे पोलीस प्रशासनाला आदेश

गावावर शोककळा

धावडशी येथे अमृता व अर्चना यांचे मृतदेह गुरुवारी आणल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. गावातील स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोठावळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून सर्व वातावरण हेलावून गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.