मंदार व धीरज हे दोघेही कारच्या पुढील भागावर आदळले व तेथून हवेत उडून पुन्हा दुभाजकावर पडल्याने गंभीर जखमी झाले.
भुईंज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) अनवडी (ता. वाई) येथे दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. मंदार रामचंद्र कोल्हटकर (वय ४४, रा. मंगळवार पेठ, सातारा) व धीरज बाळासाहेब पाटील (वय ३७, सध्या रा. सातारा. मूळ रा. वाळवा, जि. सांगली) अशी मृत व्यक्तींची नावे असून, ते तरुण भारत वृत्तपत्राचे कर्मचारी आहेत.
काल (गुरुवार) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार कोल्हटकर व धीरज पाटील हे दोघे दुचाकीवरून कामकाजानिमित्त खंडाळा (Khandala) परिसरात गेले होते. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ते साताऱ्याकडे येत होते.
महामार्गावर अनवडी गावच्या (Anavadi Village) हद्दीत तीव्र उतारावर मागून आलेल्या कारने (एमएच ०९ डीएम ८१६६) दुचाकीला (एमएच ११ बीजी ८८०६) मागून जोरदार धडक दिली. यामध्ये मंदार व धीरज हे दोघेही कारच्या पुढील भागावर आदळले व तेथून हवेत उडून पुन्हा दुभाजकावर पडल्याने गंभीर जखमी झाले. कारचालक विजय पूनमचंद शहा (वय ७५, रा. कोल्हापूर) यांनी जखमींना प्रथम कवठे येथे व नंतर एकाला सातारा येथे जिल्हा रुग्णालयात व दुसऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी भुईंज पोलिस ठाण्याचे (Bhuinj Police Station) सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात झाली असून, अधिक तपास हवालदार राजाराम माने करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.