आचारसंहितेपूर्वी मंजूर कामे पूर्ण करा; ZP अध्यक्षांचे आदेश

Zilla Parishad Election
Zilla Parishad Electionesakal
Updated on

सातारा : पुढील काही महिन्यांत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी (Satara Zilla Parishad Election) आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी मंजूर कामे तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले (Uday Kabule) यांनी प्रशासनास दिल्या. दरम्यान, स्थायी समिती सभेत पुन्हा जिल्हा परिषदेच्या स्वच्छता ठेक्याचा विषय ऐरणीवर आला. याबाबत लवकरच बैठक लावण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

Summary

पुढील काही महिन्यांत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज श्री. कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, संजीवराजे नाईक- निंबाळकर, भीमराव पाटील, दीपक पवार, शिवाजी सर्वगौड, जयवंत भोसले, सुवर्णा देसाई उपस्थित होते.

Zilla Parishad Election
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची 'शो बाजी'

गेली दीड वर्षे जिल्ह्याला कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विकासकामांना काही अंशी ब्रेक लागला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, मंजूर कामे तत्काळ मार्गी लागतील, या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर श्री. कबुले यांनी मंजूर कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेच्या ठेक्याचे काय झाले, असा प्रश्न दीपक पवार यांनी केला. याबाबत खुलासा करताना कार्यकारी अभियंता अभय पेशवे म्हणाले, ‘‘संबंधित ठेकेदाराची मुदत मार्च २०२२ पर्यंत असून, याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.’’ स्वच्छतेबाबत प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली.

Zilla Parishad Election
कऱ्हाडला सव्वाशेरांच्या तलवारी म्यान

सभागृहाला सदाशिवराव पोळ यांचे नाव देण्याचा ठराव

माण पंचायत समितीच्या सभागृहाला माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे नाव देण्याचा ठराव माण पंचायत समितीने केला आहे. या ठरावाला स्थायी समितीची शिफारस देऊन ठराव शासनाकडे पाठवण्यास स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली. महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्या गैरहजेरीत त्यांच्या वतीने उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी हा विषय मांडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()